यशवंतराव चव्हाणांसारखी आत्मियता केंद्र सरकारकडे नाही....

सरकारच्या मनात असते तर त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला असता. शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहिजे, अशी सरकारची एक घोषणा आहे. तो शेतकरी जर शेतात गेला नाही, त्याला योग्य सोयीसुविधा, बी-बियाणे, खते मिळाले नाहीत व बाजारपेठा बंद असल्या तर त्यांच्या मालाला ग्राहक आणि दुप्पट भाव तरी कसा मिळणार, असा प्रश्न खासदार पाटील यांनी उपस्थित केला.
Central government does not have intimacy like Yashwantrao Chavan ...
Central government does not have intimacy like Yashwantrao Chavan ...

कऱ्हाड : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हाताळण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांनी हातळलेल्या नागा साधूंच्या मोर्चाची आठवण त्यांनी करून देताना त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन चर्चेतून मार्ग काढला होता. तशी समयसूचकता व तेवढी आत्मियता केंद्र सरकारकडे दिसत नाही, अशी टीका साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत आज केली.  

लोकसभेत खासदार पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील विविध विषय मांडले. तसेच त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, अधिवेशन दोन संकटानंतर सुरू झाले असले तरी शेतकरी आंदोलन हाताळण्यास केंद्र  सरकार अपयशी ठरले आहे. .

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांनी हातळलेल्या नागा साधूंच्या मोर्चाची आठवण व्हावी. त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन चर्चेतून मार्ग काढला होता. तशी समयसूचकता व तेवढी आत्मियता सरकारकडे दिसत नाही.  दिल्लीच्या सीमांवर शेतकरी थंडीत बसले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यातच पाऊस झाला. २६ जानेवारी रोजी जो निर्णय झाला.

त्यापूर्वीच सरकारच्या मनात असते तर त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला असता.  शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहिजे, अशी सरकारची एक घोषणा आहे. तो शेतकरी जर शेतात गेला नाही, त्याला योग्य सोयीसुविधा, बी-बियाणे, खते मिळाले नाहीत व बाजारपेठा बंद असल्या तर त्यांच्या मालाला ग्राहक आणि दुप्पट भाव तरी कसा मिळणार, असा प्रश्न खासदार पाटील यांनी उपस्थित केला. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी पायाभरणी केलेल्या सातारा येथील सैनिक स्कूलचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, तसेच पुणे ते लोंढा रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. 

खासदार पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात एका विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मिळाला नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे शिक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध होत नसतील तर अशिक्षित मुलांचे भवितव्य तरी कसे घडविले जाणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सातारा सैनिक स्कूलला पुरेसा निधी द्या....

सातारा येथे सैनिक स्कूल आहे. त्याची स्थापना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केली. त्याची 1961 मध्ये पायाभरणी झाली आहे. मात्र ते चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. 40 वर्षापासून सेवा बजावलेल्या शिक्षकांना पेन्शन, सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. ती कामे त्वरीत पूर्ण झाली पाहिजेत. पुणे ते लोंढा रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी संपादित जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्याची चौकशी करून शेतकऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा करावा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com