'गाढवांचा' भार उचलायला बैलांचा नकार : भाई जगतापांचा राजकीय तोल गेला...

गाडीला कोणते दोन बैल जोडावेत याचा आधीच विचार करा, असा टोमणा भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे लगावला आहे.
'गाढवांचा' भार उचलायला बैलांचा नकार : भाई जगतापांचा राजकीय तोल गेला...
Bulls refuse to carry 'donkeys': Bhai Jagtap's political balance is gone

मुंबई : महागाईविरोधात आंदोलन करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची बैलगाडी मोडून पडल्याप्रकरणी भाजप नेत्यांनी त्यांच्यावर तुफान शाब्दिक टोलेबाजी केली आहे. भाई जगताप यांचा राजकीय तोल गेला, गाढवांचा भार उचलण्यास बैलांचा नकार, असे टोमणे प्रसाद लाड, केशव उपाध्ये आदींनी लगावले. Bulls refuse to carry 'donkeys': Bhai Jagtap's political balance is gone

इंधन दरवाढीवरून काँग्रेसतर्फे सध्या राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज आंदोलन झाले. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भरलेली बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून यासंदर्भात भाजप नेत्यांनी टोलेबाजी सुरु केली आहे. 

"गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा नकार, भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढेच करावे, असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!" अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे ? असा सवाल देखील लाड यांनी केला आहे. 

तर, भाई जगताप तोल सांभाळा, महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना तुमचा राजकीय तोलच गेला आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेस कार्यकर्त कोसळले तसेच राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावेत याचा आधीच विचार करा, असा टोमणा भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in