शंभूराजांच्या आशिर्वादाने मी आमदार झालो.... 

''आजचा दिवस हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण असून माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आशीर्वाद लाभले.
With the blessings of Shambhuraje, I became an MLA  says Amol Mitkari
With the blessings of Shambhuraje, I became an MLA says Amol Mitkari

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrpati Sambhaji Maharaj) जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Nationalist Congress Party) अमोल रामकृष्ण मिटकरी (MLC Amol Mitkari) यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी 
(Sharad Pawar) दिलेल्या या संधीमुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा असून हा दिवस सार्थकी लागला आहे. (With the blessings of Shambhuraj, I became an MLA )

अमोल मिटकरी हे मुळेच अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकिय व सामाजिक जीवनाची सुरुवात केली. ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे आहेत. त्यांच्या कामाची पध्दत पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतले.

त्यांच्यावर सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आणले. त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. 

आजच्या दिवसाविषयीच्या आपल्या भावना आमदार अमोल मिटकरी यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, "छत्रपती संभाजी महाराज" जयंती दिनी माझ्या "राष्ट्रवादी काँग्रेस" पक्षाने मला बिनविरोध 'विधानपरिषद सदस्य' म्हणुन सभागृहात पाठवलं. हा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असुन पक्षाने दाखवलेला विश्वास मी सार्थकी लावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार पवार व पक्षश्रेष्ठीच्या मी कायम ऋणात राहणार आहे.

आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असून आयुष्याच्या पुर्वार्धात लोकनिंदेकडे लक्ष न देता प्रामाणिकपणे शंभूचरित्र मांडत आलो आणि शंभूराजांचा आशीर्वाद जयंतीदिनी प्राप्त होणारा महाराष्ट्रातील भाग्यवान वक्ता मी ठरलो आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मला विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. आज या संघर्षाची वर्षपूर्तीची आहे.  

''आजचा दिवस हा माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण असून माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्याच दिवशी नामांकन अर्जावर स्वाक्षरी केली. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे.''

कोण आहेत, अमोल मिटकरी....

अमोल रामकृष्ण मिटकरी (जन्म: १९८२) यांचे मुळ गाव अकोला जिल्ह्यातील अकोट. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. त्यांनी संभाजी ब्रिगेडचे सदस्य म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून प्रदेश सरचिटणीस असून १४ मे २०२० मध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली.  २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com