शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांना अटक करा; भाजपच्या महिला मोर्चाचा साताऱ्यात 'चक्काजाम'

सुवर्णा पाटील म्हणाल्या, केवळ सत्ताधारी पक्षाचा नेता आणि मंत्री असल्यानेच मंत्री राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूवेळी तिच्याबरोबर असलेले दोघे कोठे गेलेत, याचा तपास करण्याची गरज ही पोलिसांना वाटू नये हे धक्कादायक आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी वानवडी पोलिसांकडून काढून घेऊन उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जावी.
BJP's women's front 'chakkajam' in Satara city
BJP's women's front 'chakkajam' in Satara city

सातारा : पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी, तसेच तिच्या मृत्यूस जबाबदार शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करून त्यांचा राजीनामा घ्यावा,, या मागणीसाठी साताऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने बॉम्बे चौकात 'चक्काजाम' आंदोलन केले.

पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूला जबाबदार असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा. तसेच पूजन चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्यानुसार साताऱ्यातही आंदोलन झाले. 

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हाध्यक्षा सुरभी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्षा स्मिता निकम, सरचिटणीस मनिषा पांडे, शहर अध्यक्षा रिना भणगे, उपाध्यक्षा वैष्णवी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. यावेळी मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, वंदे मातरम्‌.., भारत माता की जय..., आघाडी सरकार हाय हाय, संजय राठोड मुर्दाबाद, मुर्दाबाद, पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे..,अशी घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी बोलताना सुवर्णा पाटील म्हणाल्या, केवळ सत्ताधारी पक्षाचा नेता आणि मंत्री असल्यानेच मंत्री राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूवेळी तिच्याबरोबर असलेले दोघे कोठे गेलेत, याचा तपास करण्याची गरज ही पोलिसांना वाटू नये हे धक्कादायक आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी वानवडी पोलिसांकडून काढून घेऊन उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जावी.

पूजा चव्हाणला न्याय मिळावा तसेच यातील दोषी असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात निर्मला पाटील, अश्विनी हुबळीकर, उमल गिरमे, हेमा भणगे, अकला भणगे, तसेच सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जयदिप ठुसे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे, नगरसेवक सुनील काळेकर यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com