काले ग्रामपंचायतीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व; पृथ्वीराज चव्हाणांच्या गटाला धक्का 

सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींमधून ९५२१ उमेदवार रिंगणात असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तेथील ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. प्रथम टपाली मतदान मोजल्यानंतर प्रत्यक्ष ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे १५ मिनिटांच्या अंतराने निकाल जाहीर होऊ लागले आहेत.
 BJP's undisputed dominance in Kale Gram Panchayat; Push to Prithviraj Chavan's group
BJP's undisputed dominance in Kale Gram Panchayat; Push to Prithviraj Chavan's group

कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. काले ग्रामपंचायतीत भाजपच्या पॅनेलला १४ तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या आहेत. भाजपचे सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. 

सातारा जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींमधून ९५२१ उमेदवार रिंगणात असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तेथील ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. प्रथम टपाली मतदान मोजल्यानंतर प्रत्यक्ष ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामुळे १५ मिनिटांच्या अंतराने निकाल जाहीर होऊ लागले आहेत. विजयी पॅनेलच्या उमेदवारांच्या समर्थकांनी गावागावात जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. 

कऱ्हाड तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाची असलेल्या काले ग्रामपंचायतीत भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक भिमराव काका पाटील यांच्या पॅनेलने १४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर विरोधी माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे काँग्रेसचे डॉ. अजित देसाई यांच्या  पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. काले  ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता राखली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com