महिलांचा सन्मान भाषणात नको; कृतीत हवा : भाजपच्या सुरभी भोसलेंना राऊतांना टोला

राजकिय विषयावर मतभेद होणार पण महिलांची सुरक्षिततेला सगळ्या पक्षांचे प्राधान्य असले पाहिजे, हीच आजची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
BJP's Surabhi Bhosale says, Sanjayji, women should not be honored in speeches; Air in action ....
BJP's Surabhi Bhosale says, Sanjayji, women should not be honored in speeches; Air in action ....

सातारा : सन्माननीय संजय राऊत म्हणतात, आघाडी सरकरमध्ये खूप मानसन्मान दिला जातो. पण संजयजी आम्हाला सांगायचे की मानसन्मान भाषणांत नको तुमच्या कृतीत हवा आहे. ज्या दिवशी बलात्कार, विनयभंग थांबतील तेव्हा आम्ही मानू की तुम्ही महिलांचा मानसन्मान करता, असा टोला भाजपच्या महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.  

महाराष्ट्रातील आघाडी, तिघाडी सरकार हे महिलांवर होणारे अत्याचार नुसतेच डोळे विस्फारून पहात आहेत. परंतु गुन्हेगारांवर कारवाई करताना घाबरत आहे, याचा निषेध करण्यासाठी साताऱ्यातील पोवई नाका येथे भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील आणि महिला मोर्च्या सातारा जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना सुरभी भोसले म्हणाल्या, चित्रा वाघ, उमाताईंनी अनेकदा निवेदने दिली, पण आजपर्यंत महिला आयोगाला अध्यक्ष मिळालेला नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण ॲड. यशोमती ठाकूर यांनी मागणी केली, त्यांना न्याय द्या. साकिनाका येथील घटनेनंतर काही तासांत अमरावतीत अशीच घटना घडली, त्यानंतर काही दिवसांत दहिसरमध्ये घटना घडली.

त्यावेळी सन्माननीय संजय राऊत म्हणाले, आघाडी सरकारमध्ये महिलंना खूप मानसन्मान दिला जाते. पण आम्हाला माननिय संजयजी यांना सांगायचे की आम्हाला मानसन्मान भाषणांत नको, तुमच्या कृतीत हवा आहे. जेव्हा बलात्कार, विनयभंग थांबतील, तेव्हा आम्ही मानू की तुम्ही महिलांचा खरोखर मानसन्मान करताय. विरोधी पक्ष कोण आणि आता सत्तेत कोण आहे, याचा प्रश्न नाही. राजकिय विषयावर मतभेद होणार पण महिलांची सुरक्षिततेला सगळ्या पक्षांचे प्राधान्य असले पाहिजे, हीच आजची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.      
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com