श्रमिक उत्कर्ष सभेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रसाद लाड; शिवसेनेला शह देण्यासाठी रणनीती

आज कामगारवर्ग हवालदिल झाला असताना श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांची तड लावली जाईल, अशी ग्वाही लाड यांनी यावेळी दिली.
BJP's Prasad Lad as Shramik Utkarsh Sabha president; Strategies to support Shivsena
BJP's Prasad Lad as Shramik Utkarsh Sabha president; Strategies to support Shivsena

मुंबई : लोकप्रिय कामगार संघटना श्रमिक उत्कर्ष सभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनाप्रणित कामगार संघटनांना शह देण्यासाठी भाजपने उचललेले हे पाऊल असल्याचे मानले जात आहे. 

वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आणि कामगार मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे कामगार क्षेत्रात मोठे संघटन आहे. सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे हे संघटन आणखी मजबूत झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या कामगार संघटनेचाही मोठा दबदबा आहे. अशा स्थितीत भाजपची या क्षेत्रातील अनुपस्थिती भरून काढण्यासाठी पक्षातर्फे ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. 

या सभेत ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांची सरचिटणीसपदी तर भालचंद्र साळवी यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली. अध्यक्षांतर्फे उर्वरित नियुक्त्या केल्या जातील, असेही यावेळी ठरविण्यात आले. लाड हे भाजपचे विधान परिषदेतील प्रतोद असून ते वसई-विरार महापालिका प्रभारी म्हणूनही काम पहात आहेत. लाड यांनी विधीमंडळ आणि इतर व्यासपीठांमध्ये कामगारांच्या प्रश्नांवर अनेकदा आवाज उठविला आहे. 

आज कामगारवर्ग हवालदिल झाला असताना श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांची तड लावली जाईल, अशी ग्वाही लाड यांनी यावेळी दिली. केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून कामगारांसाठी योजना आणणे आणि राज्य सरकारकडून कामगारांचे हक्क मिळवून देणे हा प्रयत्न मी करेन. आपण येथे राजकीय लाभांसाठी आलो नाही. कंत्राटी कामगारांचीही युनियन करावी लागेल. सरकारशी चर्चा करण्यासाठी व दबाव टाकण्यासाठी आपण नक्कीच काम करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com