शरद पवार यांच्या संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये भाजपची मुसंडी

त्यामुळे शरद पवार संसद आदर्श ग्राम अंतर्गत दत्तक घेतलेल्या या गावात भाजपाने मुसंडी मारत सत्तांतर घडविले आहे. याची सध्या जिल्हयात चर्चा सुरु आहे. केवळ याच कारणाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एनकुळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे लक्ष लागले होते.
BJP's power in Sharad Pawar's ideal village Enkul
BJP's power in Sharad Pawar's ideal village Enkul

कातरखटाव : खासदार शरद पवार यांचे संसद आदर्श ग्राम एनकुळमध्ये सत्तांतर झाले असून येथे भाजपने मुसंडी मारली आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी विकास सेवा सोसायटीचे सचिव राजू खाडे यांच्या मदतीने ग्रामपंचायत निवडणूकीत पॅनेल टाकून नऊ पैकी सहा जागा जिंकून इतिहास घडविला. तर राष्ट्रवादी जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जून खाडे यांच्या गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत एनकुळ (ता. खटाव) गाव दत्तक घेतले होते. या गावात गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जून खाडे यांच्या गटाची सत्ता होती. यावेळेस मात्र, गावातील पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे हे पुणे येथे वास्तव्यास असतात. पण त्यांनी गावातील अनेक युवकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

त्यांनी गावातीलच विकास सेवा सोसायटीचे सचिव राजू खाडे यांच्या मदतीने पॅनेल टाकले होते. या पॅनेलने नऊ पैकी सहा जागा जिंकून इतिहास घडविला असून अनेक वर्षानंतर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन खाडे यांच्या गटाला तीन जागांवर विजय मिळविता आला. त्यामुळे शरद पवार संसद आदर्श ग्राम अंतर्गत दत्तक घेतलेल्या या गावात भाजपाने मुसंडी मारत सत्तांतर घडविले आहे. याची सध्या जिल्हयात चर्चा सुरु आहे. केवळ याच कारणाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एनकुळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकडे लक्ष लागले होते. 

तर कातरखटाव ग्रामपंचायतीत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या जानाई पॅनेलला सहा जागा मिळाल्या. तर विरोधी कात्रेश्वर पॅनेलला पाच जागा मिळाल्या. सत्ताधारी पक्षाचे पॅनेलप्रमुख व माजी सरपंच तानाजीशेठ बागल यांच्या पत्नीचा कात्रेश्वर वार्डमधून पराभूत झाल्याने गड आला पण सिंह गेला अशी जानाई पॅनेलची अवस्था झाली. कातरखटावच्या मतदारांनी जुन्या मातब्बर उमेदवारांनाही पराभवाचा धक्का दिला. यामध्ये कातरखटाव विकाससेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पत्नी छाया पाटील यांचा पराभव झाला. 

तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुशिल तरटे यांच्या आई मिरा तरटे यांचा ही पराभव झाला. त्याचप्रमाणे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यशोदा पाटील यांचे चिरंजीव अजय पाटील यांचाही पराभव झाला. भैरवनाथ वार्डमधून वीस वर्षे काम करणारे माजी उपसरपंच लक्ष्मण शिंगाडे यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. मात्र माजी सभापती मनिषा सिंहासने यांना ग्रामपंचायतीवर काम करण्याची संधी मिळाली. आणी माजी ग्रामपंचायत सदस्य जयकुमार बागल यांच्या पत्नी सावित्रा बागल यांनाही काम करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे नितीन शिंगाडे यांनाही पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com