पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार : विनोद तावडेंना विश्वास  - BJP's lotus will bloom in West Bengal: Vinod Tawde believes | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार : विनोद तावडेंना विश्वास 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना एखादा प्रदेश मिळतो, तसा मला हरियाणा मिळाला आहे. आता पक्ष आणि आमच्यासमोर एकच धेय्य आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकणं. आम्ही तिथे मोठी ताकद लावल्याचे तावडे यांनी नमूद केले.

सातारा : लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही १२१ तर तृणमूल काँग्रेस १६७ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होता. हा फरक भरुन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यावर आमचे काम सुरू आहे. यावेळी तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये देखील भाजपचे कमळ फुललेले दिसेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला. 

सांगलीला जाताना श्री. तावडे साताऱ्यात अल्पवेळ थांबले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत तावडे यांनी विविध प्रश्नांवर त्यांचे मत मांडले. पूजा चव्हाण प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी सातारा जिल्हा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना एखादा प्रदेश मिळतो, तसा मला हरियाणा मिळाला आहे. आता पक्ष आणि आमच्यासमोर एकच धेय्य आहे. ते म्हणजे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकणं. आम्ही तिथे मोठी ताकद लावल्याचे तावडे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही १२१ तर तृणमूल काँग्रेस १६७ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होता. हा फरक भरुन काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, त्यावर आमचे काम सुरू आहे. यावेळी तुम्हाला बंगालमध्ये देखील भाजपचे कमळ फुललेले दिसेल, असा विश्वासही तावडेंनी व्यक्त केला. श्री. तावडेंनी पुस्तकांच्या गाव भिलारमध्ये विविध उपक्रम झाले पाहिजेत. सध्या तेथे काही होत नाही, असे माझ्या कानावर आलंय. खरंतर कोरोनानंतर आता पुस्तकांचं गाव पुन्हा जोमात राहिल यासाठी प्रयत्न करीन, शासनही त्याला नक्कीच मदत करेल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला.
 

सातारा जिल्हा बँकेचा निर्णय प्रदेशाध्यक्षांवर... 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीबाबतचा निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले हेच घेतील असे त्यांनी  स्पष्ट केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख