देशात महागाई वाढवली म्हणून भाजपची जनआशिर्वाद यात्रा : राष्ट्रवादीचा हल्लाबोल...

आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघाले आहेत, त्यामुळे लोकं घाबरतात. त्यामुळे मतदान येईल त्यावेळी लोकच याचा निषेध व्यक्त करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
देशात महागाई वाढवली म्हणून भाजपची जनआशिर्वाद यात्रा : राष्ट्रवादीचा हल्लाबोल...
BJP's Jana Aashirwad Yatra due to rising inflation in the country: NCP's attack ...

मुंबई : भाजपची जनआशिर्वाद यात्रा कशासाठी, पेट्रोल - डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून, यांना जनतेने कशासाठी आशिर्वाद द्यायचा, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विचारला आहे. BJP's Jana Aashirwad Yatra due to rising inflation in the country: NCP's attack .

भाजपने जनआशिर्वाद यात्रा सुरू केली असून यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, या देशात कधी केंद्रीयमंत्री झाले नाहीत का? की केंद्रीयमंत्री कुणी कधी बघितले नाहीत. त्यामुळे ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद आहे. 

भाजप जनआशिर्वाद घेण्यासाठी दारात जात आहे, त्यावेळी लोकच विचारत
आहेत. आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघाले आहेत, त्यामुळे लोकं घाबरतात. त्यामुळे मतदान येईल त्यावेळी लोकच याचा निषेध व्यक्त
करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in