भाजप युवा मोर्चा मुख्य़मंत्र्यांना पाठवणार ७५ हजार पत्रे... - BJP Yuva Morcha to send 75,000 letters to CM ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

भाजप युवा मोर्चा मुख्य़मंत्र्यांना पाठवणार ७५ हजार पत्रे...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021

श्री. पाटसकर म्हणाले, भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभते का ?

कऱ्हाड : देशाचे स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित नसावे हे राज्याचे दुर्दैव आहे. याची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यातून 75 हजार पत्रे मुख्यंत्र्यांना पाठण्यात येणार आहेत. त्याचा सातारा जिल्ह्यातील प्रारंभ येथील पोस्टात पत्रे टाकुन करण्यात आल्याची माहिती युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर यांनी दिली. BJP Yuva Morcha to send 75,000 letters to CM ...

पोस्टात पत्रे टाकण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सरचिटणीस प्रमोद शिंदे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विशाल कुलकर्णी, नितीन शहा, योगेश पवार, युवा मोर्चाचे सौरभ शहा, शैलेश गोंदकर, उल्हास बेंद्रे, गणेश कापसे, अभिषेक कारंडे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : मोठी बातमी : एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; ५ कोटींची मालमत्ता जप्त

श्री. पाटसकर म्हणाले, भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभते का ? राज्यात युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही काम कराल यावरून सर्वांचा विश्वास उडाला आहे. मात्र किमान देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी आपण लक्षात ठेवावा, एवढीच आपल्या कडून माफक अपेक्षा आहे, असे पत्रात म्हंटले असल्याचे श्री. पाटसकर यांनी सांगितले.

आवश्य वाचा : पराभूत उमेदवारांना जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख