भाजप आमदाराला त्या भेटीचा राग आला आणि पाच जेसीबी नगरपालिकेला दिले...  - The BJP MLA got angry over that meeting and gave five JCBs to the municipality ... | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदाराला त्या भेटीचा राग आला आणि पाच जेसीबी नगरपालिकेला दिले... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 मे 2021

मंगेश चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर स्वच्छ भारत भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन राजकारण, गटा तटाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी, विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपले चाळीसगाव शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी करण्यासाठी या जेसीबीच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वच्छतेची कामे करावीत. यासाठी मागणी आल्यास अजून मशीन मी उपलब्ध करून देईन.

जळगाव : शहरातील नाले सफाई होत नसल्याने काही संघटनांनी चाळीसगाव पालिकेला खेळण्यातील जेसीबी (JCB) भेट दिल्या होत्या. यावर बराच वाद झाला, याच वादातून जनतेसाठी भाजप (BJP) आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांनी पाच जेसीबी मशीन पालिकेला नाले सफाईसाठी दिल्या आहेत. The BJP MLA got angry over that meeting and gave five JCBs to the municipality ...

चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून, आमदारही भाजपचे आहेत. या ठिकाणी नाले सफाई होत नसल्याने काही संघटनांनी आंदोलन करीत पालिकेला खेळण्यातले जेसीबी भेट दिले होते. यावरून चाळीसगाव तालुक्यातील जोरदार वाद पेटला होता. या चर्चेनंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आज चक्क पाच जेसीबी नगरपालिकेला कामासाठी दिले. याशिवाय आवश्यक असल्यास आणखी जेसीबी उपलब्ध करून देण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा : लेकीच्या मांडव टहाळीत नाचणे अंगलट; भाजप आमदार लांडगेंवर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण झाल्याचे औचत्य साधून हे जेसीबी पालिकेला लोकार्पण करण्यात आले, या बाबतीत मंगेश चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर स्वच्छ भारत भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन राजकारण, गटा तटाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी, विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपले चाळीसगाव शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी करण्यासाठी या जेसीबीच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वच्छतेची कामे करावीत. यासाठी मागणी आल्यास अजून मशीन मी उपलब्ध करून देईन.

आवश्य वाचा : ओबीसी समाज सरकारला माफ करणार नाही..टिळेकरांचा आंदोलनाचा इशारा..

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख