`हे तर महाविकास आघाडीचे मढ्यावरील लोणी खाणे`

आपणआपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, असे वाटले होते. परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले.
BJP leader Chitra Wagh attack on MP Sanjay Raut
BJP leader Chitra Wagh attack on MP Sanjay Raut

मुंबई : ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात. त्याचे पर्यावसन म्हणजे सरकार पंगु होते. ठाकरे सरकारच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा विविध दुर्घटनांमध्ये सरकारच्या निष्क्रीयेतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागलेत. संजयजी त्याच्यानंतर सुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच 'मढ्यावरचे लोणी खाणे' आहे, असा टोला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. BJP leader Chitra Wagh attack on MP Sanjay Raut  

चित्रा वाघ म्हणाल्या, सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत.  प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खुप जणांचे प्राण वाचू शकले असते.  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन व वृत्तवाहिन्या आधी पोहचल्या. तेथील नागरिकांनीच ३९ जणांचे मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर तब्बल १६ तासांनी प्रशासन अवतरले.

ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात. त्यांचे पर्यावसन म्हणजे सरकार पंगु होते.  ठाकरे सरकारच्या मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात बघितला तर अशा दुर्घटनांमध्ये सरकारच्या निष्क्रीयेतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले.

आवश्य वाचा : पंडित नेहरूंना कमकुवत समजणाऱ्यांनी वाजपेयी, मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा!

 संजयजी त्याच्या नंतरसुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच 'मढ्यावरचे लोणी खाणे' आहे.  नारायण राणे केंद्रातर्फे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत असताना अशावेळी अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते?, असा प्रश्न उपस्थित करून चित्रा वाघ म्हणाल्या, पुरग्रस्त कोकणच्या जनतेला हे अपेक्षितच होते.

अशावेळेस तरी आपण आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, असे वाटले होते. परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले. बाकी फौजफाटा व दर्शनसोहळा कुणी केला? याचे उत्तर येणाऱ्या दिवसांत आपल्या कर्तृत्वामुळे कोकणच्या जनतेला मिळणारच आहे, असे त्यांनी नमुद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com