"बर्ड फ्लू' साताऱ्यात पोहोचला; मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शीघ्र कृती दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. माण तालुक्यातील बिदाल व हिंगणीतही कोंबड्या दगावल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर "प्रभावित क्षेत्र' व परिसरातील दहा किलोमीटर त्रिजेचा परिसर "सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
'Bird flu reaches Satara; report of dead chickens in Mariaichiwadi positive
'Bird flu reaches Satara; report of dead chickens in Mariaichiwadi positive

सातारा : सातारा जिल्ह्यात "बर्ड फ्लू'चा शिरकाव झाला असून खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी येथील मृत कोंबड्यांना "बर्ड फ्लू'च्या (एच 5 एन 1) विषाणूची लागण झाल्याचे भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कोंबड्या, अंडी व खाद्यांची विल्हेवाट लावली जाणार असून याप्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून पशुसंवर्धन विभागाने शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू केली आहे. 

लोणंदजवळील मरिआईचीवाडी येथील वस्तींमधील गेल्या आठ दिवसांपूर्वी सुमारे 90 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. त्यातील आठ कोंबड्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले होते. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथून आणखी तपासणीसाठी भोपाळमधील संस्थेस पाठविण्यात आले. त्यानंतर काल (ता. 18) सायंकाळी "बर्ड फ्लू' संसर्गाचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र, तर दहा किलोमीटरचा परिसर "निगराणी क्षेत्र' घोषित केला आहे. हणबरवाडी (ता. कऱ्हाड) येथे काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या दगावल्या होत्या. त्या मृत कोंबड्यांचेही नमुने तपासणीसाठी भोपाळमधील संस्थेत पाठविण्यात आले होते. त्या कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, "बर्ड फ्लू'चा शिरकाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील इतर पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागास एक हजार पीपीई किट, एक हजार फेसशील्ड, हॅन्ड ग्लोज व इतर आवश्‍यक साहित्य तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. संतोष वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शीघ्र कृती दलाची नियुक्ती करण्यात आली आहे.  माण तालुक्यातील बिदाल व हिंगणीतही कोंबड्या दगावल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर "प्रभावित क्षेत्र' व परिसरातील दहा किलोमीटर त्रिजेचा परिसर "सतर्क क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता. 14) मलवडीत एक कावळा मृतावस्थेत सापडला.

हा मृत कावळा तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी (ता. 17) हिंगणीत 46 व बिदाल येथे 26 कोंबड्या अचानक दगावल्याच्या घटना घडल्या. पशुधन विकास अधिकारी डॉ. अरिफ इनामदार व डॉ. बबन मदने यांनी पाहणी केली. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने जमा करुन ते तपासणीसाठी पाठवले आहे. पुण्याहून ते भोपाळला पाठवले गेले आहेत. काल (ता. 18) पुन्हा हिंगणी येथे रामोशीवाडा या वस्तीवरील पाच शेतकऱ्यांच्या 25 कोंबड्या दगावल्या आहेत. 

तीन हजारांहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावणार 
जिल्ह्यात "बर्ड फ्लू'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री व इतर कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या ठिकाणच्या तीन हजार 500 हून अधिक कोंबड्या, त्यांची अंडी व खाद्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे, तसेच "बर्ड फ्लू'ची लागण झालेल्या परिसरात करावयाच्या कार्यवाहीसाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. 

लोणंदजवळील मरिआईचीवाडी येथील वस्तींमधील कोंबड्यांचा "बर्ड फ्लू'चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या ठिकाणचा एक किलोमीटरच्या परिसरातील पक्ष्यांचा सर्व्हे करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. 

- डॉ. अंकुश परिहार : उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com