भातखळकरांचे आरोप तथ्यहिन; त्यांना कवडीचीही किंमत नाही : महेश तपासे

जनआशिर्वाद यात्रा कोरोना काळात घेणं हे चुकीचं आहे. परंतु नैतिकतेचे भान विसरलेली भाजप जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
भातखळकरांचे आरोप तथ्यहिन; त्यांना कवडीचीही किंमत नाही : महेश तपासे
Bhatkhalkar's allegations are baseless; They don't even cost a penny: Mahesh Tapase

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या अतुल भातखळकर यांच्या तथ्यहिन आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.  Bhatkhalkar's allegations are baseless; They don't even cost a penny: Mahesh Tapase

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशभरात वाढणारी लोकप्रियता लक्षात घेऊन व देशपातळीवरील पितृतुल्य नेतृत्व आदरणीय खासदार शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करुन अतुल भातखळकर स्वतःची फालतू प्रसिद्धी करुन घेत असल्याचा जोरकस टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. 

जनआशिर्वाद यात्रा कोरोना काळात घेणं हे चुकीचं आहे. परंतु नैतिकतेचे भान विसरलेली भाजप जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे असेही महेश तपासे म्हणाले. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व इतर सर्वांनी मोठं कार्य केले आहे तेच भाजपला बघवत नाही आणि म्हणूनच राज्यसरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in