बंडातात्‍यांच्‍या सुटकेसाठी आमदार महेश शिंदेंचे वारकऱ्यांसमवेत भजन आंदोलन 

महेश शिंदे हे वारकर्‍यांसमवेत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले. या ठिकाणी भजन आंदोलनाच्‍या माध्‍यमातून शासनाचा निषेध करण्‍यात आला.
Bhajan agitation of MLA Mahesh Shinde with Warkaris for the release of the Bandatatya
Bhajan agitation of MLA Mahesh Shinde with Warkaris for the release of the Bandatatya

सातारा : पंढरपूर येथील पायी वारीत सहभागी होण्‍यासाठी निघालेल्‍या गुरुवर्य बंडातात्‍या कराडकर यांची पोलिसांच्‍या स्‍थानबध्‍दतेतून सुटका करावी, यामागणीसाठी आज कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्‍या उपस्‍थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर पुन्‍हा एकदा भजन आंदोलन करण्‍यात आले. याबाबतचे निवेदन आमदार शिंदे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांना दिले असुन त्यामध्ये बंडातात्‍यांची स्‍थानबध्‍दतेतून सुटका करत त्‍यांना वारीत सहभागी होण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी केली. Bhajan agitation of MLA Mahesh Shinde with Warkaris for the release of the Bandatatya
 
पायी वारीत सहभागी होण्‍यासाठी निघालेल्‍या बंडातात्‍या यांना पुणे पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते. यानंतर त्‍यांना कर्‍हाड येथे आणत करवडी येथील गोपालन केंद्रात स्‍थानबध्‍द करण्‍यात आले. या गोपालन केंद्राला पोलिसांनी वेढा दिला असून आतमध्‍ये जाण्‍यास इतरांना मनाई करण्‍यात आली आहे. शासनाच्‍या या कृतीचा निषेध करण्‍याचे सत्र गेले दोन दिवस जिल्‍ह्‍याच्‍या विविध भागात सुरु आहे. 

आज (शुक्रवारी) शासनाच्‍या या कृतीचा निषेध करण्‍यासाठी कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे, ह.भ.प. धनश्‍‍याम नांदगावकर यांच्‍या नेत्तृत्‍वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्‍याच्‍या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातार्‍यात येणारे रस्‍ते रोखून धरले होते. तपासणीशिवाय कोणत्‍याही वाहनांना सातार्‍यात प्रवेश देण्‍यात येत नसल्‍याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत होता.

कर्‍हाड येथून येणार्‍या वारकर्‍यांना त्‍याच ठिकाणी पोलिसांनी स्‍थानबध्‍द केल्‍याचे समजल्‍यानंतर दुपारी बाराच्‍या सुमारास महेश शिंदे हे वारकर्‍यांसमवेत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले. या ठिकाणी भजन आंदोलनाच्‍या माध्‍यमातून शासनाचा निषेध करण्‍यात आला. आंदोलन सुरु असतानाच बंडातात्‍या कराडकर यांची स्‍थानबध्‍दतेतून सुटका करावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार शिंदे, धनश्‍‍याम महाराज नांदगावकर व इतरांनी यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. या निवेदनात स्‍थानबध्‍दता मागे घेत त्‍यांना ठराविक वारकर्‍यांसह वारीत सहभागी होण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. या आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com