साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक, १०१६ रूग्ण वाढले; बगाड यात्रा अंगलट, ६१ जणांना संसर्ग - Bavdhan Bagad Yatra Corona outbreak, 61 infected | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक, १०१६ रूग्ण वाढले; बगाड यात्रा अंगलट, ६१ जणांना संसर्ग

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

बावधन परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे. वाई तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडाही वाढू लागला आहे.

सातारा : साताऱ्या कोरोनाचा उद्रेक संसर्गाचा उद्रेक झाला असून एका दिवसांत १०१६ रूग्ण पॉझिटिव्ह आले असून १४ बाधितांचा मृत्यू झालेला आहे. तर वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा गावकऱ्यांच्या अंगलट आली असून आतापर्यंत या परिसरातीली वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

कोरोनाच्या संसर्गाचा उच्चांक गाठत दिवसभरात सातारा जिल्ह्यात १०१६ रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या वाढलेल्या रूग्ण संख्येमुळे बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये गंभीर रूग्णांना व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याने नातेवाईकांची बेड शोधण्यासाठी पळापळ होत आहे. गेल्या महिनाभरापासून कमी झालेला कोरोनाचा पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे.

शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनानंतरही संसर्ग वाढत आहे. साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन तसेच आठवडाभर मिनी लॉकडाऊन असूनही संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागापुढे संसर्ग कसा रोखायचा याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शुन्य मृत्यू दरावरून आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढून १४ वर गेले आहे. जिल्हा प्रशासनाचे जमावबंदी आदेश लागू असतानाही बंदी झुगारन वाई तालुक्यातील बावधन गावाने आपली बगाड यात्रा साजरी केली होती.

 आता बावधन परिसरातील वाड्यावस्त्यांना ही यात्रा अंगलट आल्याचे चित्र आहे. बावधन परिसरातील वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्याचाही समावेश आहे. वाई तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडाही वाढू लागला आहे. आता आरोग्य यंत्रणेने वाई तालुक्यात लक्ष केंद्रीत करून येथील साखळी तोडणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजारांवर गेला असून रूग्णांना बेड मिळत नसल्याने आणखी कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

कोरोना अपडेटस्‌..

सातारा जिल्ह्यात एका दिवसात सापडलेले रूग्ण 1016 
कोरोना बधितांचा मृत्यू १४ 
बावधन परिसरात सापडले ६१ 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख