बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला... - Balasaheb Thorat's footsteps are good ...: Says congress minister Vishwajit kadam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्यातच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली तरूणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे.

सातारा : बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष विस्तारत असून ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्याच काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी होऊ शकली. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

मुंबईतील गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते रणजितसिंह देशमुख व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार भाई जगताप, आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यामुळे काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढल्याने पक्ष विस्तार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्यातच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली तरूणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे. बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख