सत्ताधाऱ्यांनी दौरे केले, पण पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली... - Authorities visited, but the flood victims were left speechless says BJP Leader Girish Mahajan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सत्ताधाऱ्यांनी दौरे केले, पण पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 31 जुलै 2021

प्रशासन पातळीवर सर्व दिरंगाई सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली. मात्र त्यावेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती.

जळगाव : सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी दौरे केले मात्र कोणतीही मदत अद्यापही दिली नाही. पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली हे दुर्दैव आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री वा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. Authorities visited, but the flood victims were left speechless says BJP Leader Girish Mahajan

ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. जळगाव मराठी पत्रकार संघातर्फे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनास गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : यिन अधिवेशनात तरुणाईने महाराष्ट्राच्या समृद्धीचे वैचारीक मंथन!

यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. महाजन म्हणाले, कोकण भागातील पूरग्रस्तांची स्थिती अत्यंत भयानक आहे. आपण त्या ठिकाणी चार दिवस होतो. लोकांचे सर्वच वाहून गेले आहे. त्यांचे अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक आहेत. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे. सामाजिक संस्था, आमच्या पक्षातर्फे मदत सुरू झाली आहे. मात्र शासनाची मदत अद्यापही मिळाली नाही. 

आवश्य वाचा : त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही ! राणे, खोत यांच्या टीकेला रोहित पवारांचे खरमरीत उत्तर

राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठीण काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत न करता तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता तातडीने पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा गतिमान करण्याची गरज आहे.

प्रशासन पातळीवर सर्व दिरंगाई सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली. मात्र त्यावेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती. शासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू आहे. आजपर्यंत आपण असे शासन कधीच पाहिले नव्हते, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख