हँड ग्रेनेडप्रकरणी एटीएस करणार जवानांची चौकशी; काही साक्षीदार पोलिसांच्या हाती 
ATS interrogates military personnel in hand grenade case

हँड ग्रेनेडप्रकरणी एटीएस करणार जवानांची चौकशी; काही साक्षीदार पोलिसांच्या हाती 

नदीपात्रात बाँब आले कोठून, त्याचा दहशतविरोधी पथकासह तालुका पोलिसांनी कसून तपास करून छडा लावावा, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच ॲड. विजय पाटील यांनी ग्रामस्थांतर्फे केली आहे.

कऱ्हाड : तांबवे (Tambave) पुलाखालील कोयना नदीपात्रात (Koyana River) सापडलेला सैन्य दलातील बाँब प्रकरणात कऱ्हाड तालुका पोलिसांनी (Karad Police) तांबवेसह परिसरात सैन्यदलात कार्यरत जवानांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासोबत लष्करातून नुकत्यात निवृत्त झालेल्यांचीही माहिती एटीएस (ATS) पथक व पोलिस घेत आहेत. त्यात काही साक्षीदारही पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. (ATS interrogates military personnel in hand grenade case; Some witnesses in the hands of the police)

त्या संबंधितांकडून तपासाच्या अनुशंगाने महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. तांबवे पुलाखाली सैन्य दलातील तीन हॅन्ड ग्रेनेड बॉब सापडल्याने मोठा गलका उडाला आहे. या घटनेन त्या परिसरात भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी त्याच दिवशी तिन्ही बाँब परिसरात निकामी केले. मात्र, अद्यापही त्याची दबक्‍या आवाजात भागात चर्चा आहे. त्यामुळे बाँब प्रकरणाचा कसून तपास करावा, अशी मागणी विभागातील ग्रामस्थांतून होऊ लागली आहे. 

नदीपात्रात बाँब आले कोठून, त्याचा दहशतविरोधी पथकासह तालुका पोलिसांनी कसून तपास करून छडा लावावा, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच ॲड. विजय पाटील यांनी ग्रामस्थांतर्फे केली आहे. तांबवेचे उपसरपंच ऍड. पाटील यांनी त्याची रितसर मागणी पोलिसांकडे केली आहे. नदीपात्रात सापडलेले बॉंब म्हणजे भागातील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ आहे, त्यामुळे त्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी नोंदवली आहे. 

तांबवेच्या जुन्या कोयना पुलाखाली बाँब सापडले. त्या घटनास्थळी साताऱ्यासह पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने भेट देवून तेथे पाहणी केली. तालुका पोलिसांशी त्या प्रकरणाबाबत सखोल चर्चा केली आहे. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्या तपासाचे काम सुरूच ठेवले आहे. त्यासोबतच तालुका पोलिसांनीही तांबवे भागात दिवसभर तळ ठोकून त्याच्या तपासाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार सैन्यदलात सध्या कार्यरत असलेल्या व अलीकडच्या काळात निवृत्त झालेल्या जवानांची माहिती पोलिस संकलीत करत आहेत. त्यानुसार सविस्तर माहितीची नोंद घेतली जात आहे. त्याबाबतच्या काही साक्षीही पोलिसांनी नोंदवल्या. काही साक्षीदारांनीही महत्वाची माहिती दिल्याचे त्याचाच धागा धरून तालुका पोलिस यापुढच्या काळात तपास करणार आहेत. 

नदीपात्रात बाँब आले कोठून, त्याचा दहशत विरोधी पथकासह कराड तालुका पोलिसांनी कसून तपास करून छडा लावावा. 
- ॲड. विजय पाटील (उपसरपंच, तांबवे)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in