भाजप आमदार चव्हाण यांना अटक करा - Arrest BJP MLA Chavan says Minister Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार चव्हाण यांना अटक करा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 25 जून 2021

मंत्री आव्हाड म्हणाले,  भाजपा आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य म्हणजे  ओबीसी समाजाला बदनाम करण्याची उचललेली सुपारी आहे.

कल्याण : भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यावर आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यास प्रतिउत्तर देताना ओबीसी समाजाला बदनाम करण्याची उचललेली ही सुपारी असून ओबीसी समाज जर शांततेत मोर्चा काढणार असेल तर त्यामध्ये अतिरेकी वृत्तीची माणसं घुसवून समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेलंय. या षडयंत्र रचणाऱ्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल भाजपच्यावतीने राज्यभर उद्या (शनिवारी) आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी कल्याण पूर्व भागात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदाराने आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा : अबब ! २० हजार एकर जमीन गैरव्यवहार, दोन गावे `गॅस`वर, माजी न्यायमूर्तींचा आरोप

भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केले होते. याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कल्याण पूर्व  मतदार संघातील गोरपे गावात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे पिण्याच्या पाईप लाईन कामाच्या भूमीपूजनासाठी आले होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवकचे सुधीर वंडार पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आवश्य वाचा : कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा जिल्ह्यांत लाॅकडाऊनमध्ये अजिबात सूट नाही

मंत्री आव्हाड म्हणाले,  भाजपा आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य म्हणजे  ओबीसी समाजाला बदनाम करण्याची उचललेली सुपारी आहे. मोर्चात अतिरेकी वृत्तीची माणसं घुसवून समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेलं आहे. हे  षडयंत्र रचणाऱ्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख