सातारा नियोजन समिती नियुक्ती : पालकमंत्र्यांची मर्जी ठरली महत्वाची!

नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात. नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित १४ सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १२, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत.
सातारा नियोजन समिती नियुक्ती : पालकमंत्र्यांची मर्जी ठरली महत्वाची!
Appointment of Satara Planning Committee: The will of the Guardian Minister is important!

सातारा : सातारा जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची यादी आज जाहीर झाली. यामध्ये दोन विद्यमान आमदारांसह विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या तिघांना संधी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीच्या यादीत पालकमंत्र्यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाल्याने नाराजीचा सुर उमटला आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना नियोजन समितीवर पाठविले आहे. Appointment of Satara Planning Committee: The will of the Guardian Minister is important!

जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची यादी आज जाहीर झाली. गेल्या दीड महिन्यांपासून या यादीवर मुख्यमंत्र्यांची सही कधी होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली होती. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी बी. जे. जगदाळे यांना पाठविले आहे. यामध्ये २० सदस्यांमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.

 नियोजन समितीवर सत्तेत असलेल्या पक्षांच्या सदस्यांना काम करता यावे यासाठी विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने उपमुख्यमंत्री करतात. त्यानंतर अंतिम यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीने प्रसिध्द केली जाते. त्यानुसार आज सातारा जिल्ह्यातील नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या जिल्ह्यातील सदस्यांना या माध्यमातून नियोजन समितीवर घेतले जाते.

त्यानुसार ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे. त्यांना जादा जागा दिल्या जातात. यामध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात. नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित १४ सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १२, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत. यामध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील व दीपक चव्हाण यांच्या नावाचा समावेश केला आहे.

तसेच जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेले तज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, शिवसेनेतून जयवंत शेलार यांचा समावेश केला आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून धैर्यशिल अनपट, ॲड. श्यामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेश्चंद्र उर्फ राजभाऊ काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील. काँग्रेसमधून अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील, शिवसेनेतून शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहूल बर्गे यांच्या नावाचा समावेश आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in