कोविड हॉस्पिटलसाठी पूर्णवेळ ऑडिटर नेमा; मोठ्या गावात ३० बेडचे कोविड हॉस्पिटल होणार.....

काही नागरिक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलिस विभागामार्फत कडक कारवाई करावी.शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडीट करा. हे ऑडीट सातत्याने करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.श्री. पवार म्हणाले, साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करावे, यासाठी त्यांच्यासोबत बैठका घ्या.
Appoint a full-time auditor for Covid Hospital; There will be a 30 bed covid hospital in a big village .....
Appoint a full-time auditor for Covid Hospital; There will be a 30 bed covid hospital in a big village .....

सातारा : जिल्ह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात (Covid Hospital) पूर्ण वेळ ऑडीटर (Auditor) नेमावेत तसेच मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरु करावे. कोविड सेवेतील कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या द्या. येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली (Break the Chain) पाहिजे असे नियोजन करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit pawar)  यांनी केल्या. Appoint a full-time auditor for Covid Hospital; There will be a 30 bed covid hospital in a big village says Dy CM Ajit pawar

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.

गृह विलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरण बंद करुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशा सूचना करुन श्री. पवार म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा 24 तासात शोध लावून त्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी. जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत.

तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलिस विभागामार्फत कडक कारवाई करावी. शासकीय तसेच खासगी कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, तसेच इलेक्ट्रिक ऑडीट करा. हे ऑडीट सातत्याने करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. श्री. पवार म्हणाले, साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करावे, यासाठी त्यांच्यासोबत बैठका घ्या. आमदारांना कोरोना संसर्गाबाबत एक कोटीपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांनी त्यांचा निधी योग्य पद्धतीने खर्च करावा.

प्रत्येक नागरिकाला योग्य पद्धतीने उपचार मिळावेत यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही अजित पवार यांनी बैठकीत दिले. जास्तीत जास्त नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर द्यावा. गृह विलगीकरणातील कोरोना रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात हलवावे, प्रामुख्याने याची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करावी. जे कोरोना केअर बंद केले आहेत त्यांना सुरु करुन तेथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची जेवण्याची चांगली व्यवस्थेबरोबर त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने औषधोपचार करावेत. 

ज्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत, परंतु जी प्रकरणे प्रलंबित आहेत अशी प्रकरणे तात्काळ मंजुर केले जातील, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत असल्याचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या उपाय योजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.  या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com