माझ्या अंगात अण्णासाहेबांचे रक्त; न्याय मिळेपर्यंत लढा देणार... - Annasaheb blood on my body; Will fight till justice: Narendra Patil | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या अंगात अण्णासाहेबांचे रक्त; न्याय मिळेपर्यंत लढा देणार...

राजेश पाटील 
गुरुवार, 13 मे 2021

हा लढा पुढेही ताकदीने सुरूच ठेवणार आहोत. पुढच्याच आठवड्यात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन राज्य शासनाने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावे म्हणून विनंती करायला सांगणार आहोत.

ढेबेवाडी (ता. पाटण) : ''माझ्या अंगात अण्णासाहेब पाटलांचे (Annasaheb Patil) रक्त आहे. यश-अपयश न बघता कामगारांसाठी लढत राहणे एवढंच आम्हाला ठावूक आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माथाडी नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिला आहे. माथाडी कामगारांच्या (Mathadi Workers) विविध प्रश्नी उभारलेला हा लढा विशिष्ठ संघटनेच्या सभासदांपुरता मर्यादीत नाही. राज्यातील तमाम माथाडी कामगार व संलग्न घटकांसाठी हा लढा असून संबधित विविध संघटनांनीही त्यामध्ये उतरायला पाहिजे', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Annasaheb blood on my body; Will fight till justice: Narendra Patil)

राज्यातील माथाडी कामगार व संलग्न घटकांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करून त्यांना रेल्वे व बसमधून प्रवासाला परवानगी द्यावी आणि विमा कवचही लागू करावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने उभारलेल्या लढ्याच्या पुढील रणनीतीची माहिती देवून लढ्यात सहभागी कामगार व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी श्री.पाटील यांनी त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. 

हेही वाचा : धनंजय मुंडे यांची `ती` प्रेमकथा लवकरच पुस्तकात; करुणा यांची पोस्ट..

नरेंद्र पाटील म्हणाले, ''या प्रश्नी गेल्या काही दिवसांत आम्ही विविध मार्गाने लढा उभारला. महाराष्ट्र व कामगार दिनी मुंबई परिसरातील 27 रेल्वे स्थानकासमोर मागण्यांचे फलक हातात घेऊन लक्ष वेधले. न्याय हक्क सप्ताह, काम बंद आंदोलन, निवेदने, विविध पक्षाचे पदाधिकारी व मंत्र्यांच्या भेटीगाठी या बरोबरच राज्यपालांना भेटून मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्याची विनंतीही केली.

आवश्य वाचा :  भाजपच्या आमदार-खासदारांनी मांडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

आता राज्य शासन काय निर्णय घेतंय याकडे आमचे लक्ष आहे. हा लढा पुढेही ताकदीने सुरूच ठेवणार आहोत. पुढच्याच आठवड्यात विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन राज्य शासनाने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावे म्हणून विनंती करायला सांगणार आहोत. हे विशिष्ठ संघटनेच्या सभासदांपुरते आंदोलन नसून राज्यभरातील माथाडी कामगारांसाठी आहे, हे समजून घ्या. मुंबईतच माथाडी कामगारांच्या शंभरभर संघटना आहेत. त्यांनीही लढ्यात उतरून शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधावे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख