अखेर पृथ्वीराज चव्हाण-विलासराव उंडाळकरांच्या मनोमिलनाची तारीख ठरली - The animosity is over; Prithviraj Chavan- Undalkar will come on a platform | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर पृथ्वीराज चव्हाण-विलासराव उंडाळकरांच्या मनोमिलनाची तारीख ठरली

हेमंत पवार
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कराड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे. तेथे माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ॲड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवुन पहिल्यांदाच शुक्रवारी (ता. 6) एका व्यासपीठावर येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजता हा मेळावा होईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा.धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे, आप्पासाहेब माने, नगरसेवक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.  श्री. जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यातम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात हे शुक्रवारी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सातारा येथे आढावा बैठक होईल. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत कराड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे.

तेथे माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ॲड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख