अन्‌ जयंत पाटील तीन लाखांना फसले.... - And Jayant Patil cheated three lakhs .... | Politics Marathi News - Sarkarnama

अन्‌ जयंत पाटील तीन लाखांना फसले....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, असे ठिकाण नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यापारी त्यांची फसवणूक करत असतो. त्यासाठी शेतकरी जागृत राहिला तरच फसवणूक होत नाही. पण शेती करताना चक्क राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही व्यापाऱ्यांनी शेती करताना फसविले आहे.

सातारा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दहा वर्षापूर्वी शेती केली. त्यांनी ढबु मिरचीची लागवड केली होती. यातून त्यांना पहिले दोन तीन महिने चांगले पैसे मिळाले. त्यामुळे त्यांना आपण चांगली शेती करू शकतो असे वाटू लागले. पण व्यापाऱ्याने त्यांना माल खराब आहे, असे सांगून कमी पैसे देऊ लागले. यातून त्यांची तीन लाखांची फसवणूक झाली.अशी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांनी किस्सा सांगली जिल्ह्यातील आष्ठा येथील केळी सौद्याते सांगितला. 

शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, असे ठिकाण नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यापारी त्यांची फसवणूक करत असतो. त्यासाठी शेतकरी जागृत राहिला तरच फसवणूक होत नाही. पण शेती करताना चक्क राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही व्यापाऱ्यांनी शेती करताना फसविले आहे.

याचा किस्सा सांगताना जयंत पाटील म्हणाले, 1992 ते 1993 मध्ये मी पण शेती केली होती. त्यावेळी लाल, हिरवी, पिवळी ढबु मिरचीची लागवड केली. सुरवातीला दोन ते तीन महिने चांगले पैसे मिळाले. त्यामुळे मला पण वाटले की आपण चांगली शेती करू लागलो. पण, नंतर व्यापारी माल खराब आहे, असे सांगून कमी पैसे देऊ लागला. त्यामुळे माझी दोन ते तीन लाखांची फसवणूक झाली. मीही फसलो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख