समाजात फुट पाडण्यास सर्व आमदार, खासदारच जबाबदार....  - All MLAs, MPs are responsible for dividing the society ... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

समाजात फुट पाडण्यास सर्व आमदार, खासदारच जबाबदार.... 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 12 जून 2021

ज्यांनी निवडून दिले त्या समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण आता कोण या जातीला जवळ करतोय कोण त्या जातीला जवळ करतोय. कुठली जात कुठली पात, यामुळेच लहानपणाचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत.

सातारा : सध्या निसर्गाचा आणि समाजाचाही समतोल ढासळला आहे. समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार MLA, खासदारांनी MPs केले असून तेच या सगळ्याला जबाबदार आहेत. यातूनच जातीभेदाचे राजकारण सुरू असून लहानपणीचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यथा समाजाचे व देशाचे तुकडे होतील, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी व्यक्त केले. All MLAs, MPs are responsible for dividing the society ...

महाविकास आघाडी एकत्र लढू शकेल का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, कोणी कोणालासोबत घेऊन लढायचे ते प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मी तर एकटाच लढतोय. निवडणूकीऐवजी स्पर्धा ठेवली तर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या लोकांना मतदारांची गरज आहे. पण काही प्रश्नांवर तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना विचारा, आपण काय केले पाहिजे.

हेही वाचा : हेवेदावे प्रत्येकच पक्षात असतात, पण आता संघटनेवर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही...

निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत लोकांचे मत विचारात घेतात. निवडून आल्यानंतर आपले मत लोकांना सांगायचे असते. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या चार, पाच किंवा सहा तारखेला पाऊस हमखास पडणार म्हणजे पडणारच. त्यावेळी निसर्गाचा आणि समाजाचा समतोल व्यवस्थित होता. पण आता निसर्गासह समाजाचाही समतोल ढासळलेला आहे. माझे ठाम मत आहे की, समाजात फुट पाडण्याचे काम या सर्व आमदार, खासदारांनी केले आहे. तेच या सगळ्याला जबाबदार आहेत.

आवश्य वाचा : प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी नाही..

ज्यांनी निवडून दिले त्या समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. पण आता कोण या जातीला जवळ करतोय कोण त्या जातीला जवळ करतोय. कुठली जात कुठली पात, यामुळेच लहानपणाचे मित्र देखील एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. त्यांच्या या गुणांमुळे आंदोलन बिंदोलन फालतूगिरी आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनी काही केलेले नाही. त्यामुळे आता लोकांनी जाब विचारला पाहिजे. अन्यथा, समाजाचे व देशाचे तुकडे होतील. माझे सुध्दा विविध जातीतील मित्र आहेत. तेसुध्दा बोलायला तयार नाहीत, असेही उदयनराजेंनी नमुद केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख