अलका कुबल, प्राजक्ताचा वाद उदयनराजेंच्या कोर्टात

चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.
Alka Kubal, Prajakta's case in Udayanraje's court
Alka Kubal, Prajakta's case in Udayanraje's court

सातारा : काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ''माझी आई काळुबाई'' या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.

अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर वाद पेटलेला आहे. या प्रकरणात साताऱ्यासह राज्यातील काही संघटनांनी अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी, तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे.

अन्यथा, साताऱ्यात सुरु असलेले ''माझी आई काळुबाई'' या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे
भोसले यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची वस्तुस्थिती नेमकी काय होती ही मांडली.

वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी ही मालिका अर्ध्यातूनच सोडली आहे. यातूनच अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. तसेच याबाबत चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.

तक्रार करूनही दाखल नाही : प्राजक्ता गायकवाड
कोरोनाची मालिकेचे चित्रीकरण मुंबईत करण्यात यावे, असे ठरले होते. म्हणून सगळे क्रू-मेंबर मुंबईला परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीने परतायचे होते. मात्र, विवेकला उशीर झाल्याने प्राजक्ताने कारण विचारले. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचे सांगितल्यावर ती थोडी घाबरली. मात्र हे बोलून दाखविल्यावर विवेकने मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले, असा आरोप प्राजक्ताने केला आहे.

प्राजक्ताने मालिका सोडल्याचे कारण सांगताना अलका कुबल म्हणाल्या, सतत परीक्षेच्या नावाने सुट्ट्या घेते आणि कार्यक्रम करते. यावर प्राजक्ताने आपली बाजू स्पष्ट केली आहे. ती म्हणते, मी परीक्षेसाठी सुटी घेणार हे आधीच सांगितले होते. माझ्यामुळे कधीच चित्रीकरण थांबलेले नाही. मी इव्हेंटची सुपारी घेते, असा आरोप झाला, त्यात तथ्य नाही. कोरोनामुळे सध्या इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे हे कारण पटणारं नाही. तसेच या मालिकेत मला तोकडे कपडे घालण्याचे काही प्रसंग होते, त्याला माझा विरोध होता. त्यानंतर मला चक्क रक्त लागलेली साडी दिली गेली. माझ्या आईने त्याविषयी विचारले तर, त्याला माझ्या आईचा हस्तक्षेप म्हटले जात आहे. 

प्राजक्ताने आपली बाजू मांडताना सांगितले की, मी एका सामान्य घरातील मुलगी आहे. माझे वडील आठ ते 10 तास काम करतात. तेव्हा आमच्या घरात चूल पेटते. असे असतानाही मला आतापर्यंत मालिकेचा एकही रूपायाही मिळालेला नाही. उलट मला बदनाम केले जाते आहे. मला या मालिकेचे आतापर्यंत एकही दिवसाचे मानधन मिळालेले नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com