अजितदादांच्या म्हणण्याला काडीची ही किंमत नाही : आमदार पडळकर

शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळे दर्‍याखोर्‍यात जाऊन मोगलांशी लढत होते. आताचे जे सरकार आहे ते मोगलांच्या वृत्तीचे सरकार असल्याचाही आरोप आमदार पडळकर यांनी येथे केला आहे.
अजितदादांच्या म्हणण्याला काडीची ही किंमत नाही : आमदार पडळकर
Ajit Pawar's words have no value: MLA Padalkar

कऱ्हाड : बैलगाडी शर्यतप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात, त्याला काडीची किंमत नाही. त्यांनी बैलगाडी शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणं आहेत. बैलगाडी शर्यतीबाबत अनेकदा वेगवेगळी विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला. Ajit Pawar's words have no value: MLA Padalkar

गोवारे (ता. कऱ्हाड) येथे गोपीचंद पडळकर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार पडळकर म्हणाले, ''बैलगाडी शर्यत सुरु करणे हा राजकारणाचा मुद्दा नाही. मात्र शर्यत सुरु करणे हा स्टंट नाही. झरे गावातील बैलगाडी शर्यतीसाठी हजार पोलिस झरे सारख्या गावात येतात, म्हणजे सरकारला हे आंदोलन मोडून काढायचं आहे. त्यामुळे बैलगाडी मालक शांत होताहेत. 

खासदार, आमदारांच्या दारात जावुन बैलगाडी मालक दोन वर्षापासुन निवेदन देत आहेत. मग तुम्ही दोन वर्षात न्यायालयात याप्रश्नी सरकार म्हणुन का गेला नाही. मराठा आरक्षणाची तारीख झाली तेव्हा चालढकलपणा केला. त्यांनीच वकील नेमला होता. त्यावेळी सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही,'' असे अजित पवार सांगतात. 

आवश्य वाचा : नारायण राणेंचा व्यवसाय कोंबडी चोरण्याचा!
 
ओबीसींच्या राजकीय आक्षणाच्या बाबतीत पंधरा महिन्यात आठ तारखा पडल्या पण तुम्ही एकदाही सरकारने म्हणणे मांडले नाही. अन् बैलगाड्यांच्या बाबतीत तारीखच पडली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. पंधरा ते वीस किलोमीटर अंतर शेतकरी चालायला लागले. हे महाराष्ट्रातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डोंगर दर्‍यामध्ये हे मावळे फिरायचे, अशी वेळ तुम्ही शेतकर्‍यांच्यावर आणली. ह्यांचा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळे दर्‍याखोर्‍यात जाऊन मोगलांशी लढत होते. आताचे जे सरकार आहे ते मोगलांच्या वृत्तीचे सरकार असल्याचाही आरोप आमदार पडळकर यांनी येथे केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in