साताऱ्यातील भाजपच्या आमदारावर अजित पवारांचा डोळा...

शिवेंद्रसिंहराजेंची अजित पवारांशी असलेली जवळीक आगामी काळात परिवर्तनाची नांदी ठरू शकणार आहे. कदाचित शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याचीच खेळी अजित पवार या विकास कामांच्या माध्यमातून करत नाहीत ना, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
MLA Shivendraraje Bhosale and DyCM Ajit Pawar
MLA Shivendraraje Bhosale and DyCM Ajit Pawar

सातारा : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा चुचकारण्यास अजितदादांनी सुरवात केली आहे. एकनाथ खडसे यांच्या
प्रवेशानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दुसरे नाव हे शिवेंद्रसिंहराजे यांचे घेण्यात येत आहे. यावर अधिकृत कोणी काही बोलत नसले तरी अजित पवार या आमदारांना व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याची मंत्रालयात चर्चा आहे. साताऱ्यात भाजपचे जयकुमार गोरे हे दुसरे आमदार आहेत. मात्र, त्यांचे राष्ट्रवादीशी फारसे सख्य नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर तरी अजितदादांचा डोळा आहे.

भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विकास कामांच्या निमित्ताने कायम संपर्क
ठेवलेला आहे. श्री. पवार यांच्याशी असलेल्या जवळीकतेतून त्यांनी सातारा शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांना विरोधी पक्षात असूनही मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला आहे. एकुणच विरोधी पक्षात असूनही अजित पवारांशी शिवेंद्रसिंहराजेंची जवळीक राजकिय वर्तूळात चर्चेची ठरली आहे.

सध्या राष्ट्रवादीत इनकमिंगचे वारे सुरू असून सातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार अजित पवारांच्या गळाला लागणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. सातारा लोकसभेची पोट निवडणुक आणि विधानसभेची निवडणुक एकत्र झाली. पण त्यापूर्वी देशात व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता असल्याने शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

राज्यात भाजपची सत्ता आल्यास शिवेंद्रसिंहराजे मंत्री होतील, मग आपल्याला कोणी विचारणार नाही, या उद्देशाने चार महिन्यात खासदार उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उदयनराजेंची पाठ सोडण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेच भाजपमध्ये आल्याने अडचण झाली. तरीही शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तर उदयनराजेंचा पराभव झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही शिवेंद्रसिंहराजेंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले. राष्ट्रवादीत असूनही उदयनराजेंच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजेंना ताकद देण्याचे काम अजित पवार यांनी केले. त्यामुळे सातारा, जावळीतील विकास कामांसाठी शिवेंद्रसिंहराजे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आग्रह धरून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून आणत होते. पण राष्ट्रवादीत असताना शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रीपदापर्यंत
पोहोचून दिले नाही. त्याला कै. अभयसिंहराजे भोसले यांच्यावेळेपासूनची काही कारणे कारणीभूत आहेत.

शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये जाऊन आमदार झाले असले तरी त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांशी असलेला संपर्क व सलोखा तुटलेला नाही. 
त्यांनी सातारा व जावळी तालुक्यातील विविध विकास कामे श्री. पवार यांच्या माध्यमातून मंजूर करून आणून त्याला आवश्यक निधीही उपलब्ध करून आणला आहे. कास धरणाचे काम भाजप, शिवसेनेच्या काळात वेगाने सुरू होते.

पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निधी अभावी रखडले होते. पण शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध केला. तसेच सातारच्या मेडिकल कॉलेजच्या वाढीव जागेसाठीही ६१ कोटींचा निधी श्री. पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. एकुणच भाजपचे आमदार असूनही शिवेंद्रसिंहराजेंची अजित पवारांसोबत असलेली नाळ तुटलेली नाही. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात भाजपचे आमदार राष्ट्रवादीत आणून आम्ही निवडून आणू शकतो, असे सांगतात. ते खरे करण्यासाठीच ते शिवेंद्रसिंहराजेंना विविध विकास कामांच्या निमित्ताने निधी देत आहेत. शिवेंद्रसिंहराजेंची अजित पवारांशी असलेली जवळीक आगामी काळात परिवर्तनाची नांदी ठरू शकणार आहे. कदाचित शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याचीच खेळी अजित पवार या विकास कामांच्या माध्यमातून करत नाहीत ना, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सध्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनापुन्हा चुचकारण्यास अजितदादांनी सुरवात केली आहे. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यानंतर दुसरे नाव साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे घेण्यात येत आहे. यावर अधिकृत कोणी काही बोलत नसले तरी अजित पवार या आमदारांना व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याची मंत्रालयात चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com