अजित पवारांनी सारथी बंद केले; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक चव्हाणांनी बरखास्त केले....

मराठा आरक्षणासाठी न्यायालयात महाआघाडी शासनाने योग्य युक्तीवाद न केल्याने त्यास स्थगिती मिळाली, असा आरोप करुन श्री. पाटील म्हणाले," 20 दिवस अनेक गावातून आंदोलनाला पाठींबा मिळाला. मंत्री शंभुराज देसाई येऊन गेले. पण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य फिरकले नाहीत.''
Ajit Pawar closed the Sarathi, Ashok Chavan dismissed the Director of Annasaheb Patil Corporation says Narendra Patil
Ajit Pawar closed the Sarathi, Ashok Chavan dismissed the Director of Annasaheb Patil Corporation says Narendra Patil

पाटण : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सारथी, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, छत्रपती शाहू शिष्यवृत्ती अशा योजनातून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हेतुने सारथी बंद केले. त्यातील 352 मराठा बांधवांच्या नोकऱ्या गेल्या. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, तर आण्णासाहेब पाटील महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज पाटण येथे केला.
 
मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळ कोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  श्री. म्हणाले," माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील यांनी 1980 मध्ये आरक्षणासंदर्भात राज्यभर जनजागृती केली. 22 मार्च 1980 ला मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला. मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने दबाव टाकला.

त्यातच त्यांनी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर कोपर्डी येथील मराठा समाजाच्या युवतीवर अत्याचार झाले आणि संपुर्ण मराठा समाज एकवटला. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यास न्यायालयात आव्हान दिले गेले आणि आरक्षणाचा लढा न्यायालयीन कक्षेत गेला. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने सारथी, आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, छत्रपती शाहू शिष्यवृत्ती अशा योजनातून मराठा समाजाला न्याय दिला.

परंतु, विद्यमान सरकारने राजकीय हेतूने सारथी बंद केले. त्यातील 352 मराठा बांधवांच्या नोकऱ्या गेल्या. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, तर महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त होण्यास मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत.''  मराठा आरक्षणासाठी न्यायालयात महाआघाडी शासनाने योग्य युक्तीवाद न केल्याने त्यास स्थगिती मिळाली, असा आरोप करुन श्री. पाटील म्हणाले," 20 दिवस अनेक गावातून आंदोलनाला पाठींबा मिळाला. मंत्री शंभुराज देसाई येऊन गेले. पण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य फिरकले नाहीत.'' 

आजही मी शिवसेनेतच.... 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात न घेता मला (कै.) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी दिली होती, असे स्पष्ट करुन नरेंद्र पाटील म्हणाले," लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या माध्यमातुन लढलो असुन, आजही मी अधिकृतपणे शिवसेनेतच आहे.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com