खंबाटकी घाटात अग्नितांडव; मालट्रक, कार जळून खाक - Agnitandava in Khambhatki Ghat; Burn trucks, burn cars | Politics Marathi News - Sarkarnama

खंबाटकी घाटात अग्नितांडव; मालट्रक, कार जळून खाक

अश्पाक पटेल
बुधवार, 7 एप्रिल 2021

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात आज कोणीतरी वणवा लावला होता. या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने घाटात सर्वत्र धुराचे लोट उसळले होते. या दुपारी दोनच्या सुमारास आगीच्या संपर्कात आल्याने खंबाटकी घाटातील दत्तमंदिर कॉर्नर जवळ एका मालट्रकने व त्यानंतर मागेच असलेल्या कारनेही पेट घेतला.

खंडाळा : खंबाटकी घाटात लागलेल्या वणव्याच्या आगीत मालट्रक व कार जळून खाक झाली आहे. महामार्गावरील अग्नितांडवामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली असून सुरक्षिततेसाठी महामार्गावरील वाहतूक खंबाटकी बोगद्यातून विरुद्ध बाजूने वळवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात आज कोणीतरी वणवा लावला होता. या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने घाटात सर्वत्र धुराचे लोट उसळले होते. या दुपारी दोनच्या सुमारास आगीच्या संपर्कात आल्याने खंबाटकी घाटातील दत्तमंदिर कॉर्नर जवळ एका मालट्रकने व त्यानंतर मागेच असलेल्या कारनेही पेट घेतला.

या आगीत मालट्रक व कार जळून खाक झाले आहेत. सुरक्षिततेसाठी घाटातील वाहतून विरूध्द बाजूने वळविण्यात आली आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. घटनास्थळी भुईंज पोलिस व अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख