कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी 'कृष्णा'च्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा....

राजकीय पक्ष निवडणूक लढवून मोकळे होतील. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीतयेईल याचा विचार करुन शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा. प्रशासनाने जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी. असेही श्री. मुल्ला यांना नमुद केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी 'कृष्णा'च्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा....
Against the backdrop of Corona, farmers should boycott the election of 'Krishna' ....

कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishan Sugar factory election) होऊ घातलेली निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  (Corona Pandamic) तात्काळ रद्द करावी. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीत येईल याचा विचार करुन शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Shetkari Sanghatna) जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. Against the backdrop of Corona, farmers should boycott the election of 'Krishna' ....

निवेदनातील माहिती अशी की, कोरोना महामारी विरूध्द सध्या लढा सुरु आहे. मागीलवर्षीही कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. याही वर्षी कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे दोन महिने प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात लाकडाउन सुरु आहे. तरीही कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही. अशातच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

कोरोनाने थैमान घातले असतानाच कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आल्याने बळीराजा शेतकरी संघटना त्याचा निषेध करत आहे. निवडणूक लागली म्हणजे प्रचारसभा, मेळावे सुरु होणार. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होणार. कारखान्याचे कार्यक्षेत्र दोन जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारखान्याच्या सभासदांच्या जिवावर उठून जर ही निवडणूक लढवणार असेल तर त्याला आमचा विरोध राहील.

राजकीय पक्ष निवडणूक लढवून मोकळे होतील. कोरोनामुळे आपले कुटुंब अडचणीतयेईल याचा विचार करुन शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा. प्रशासनाने जोपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी. असेही श्री. मुल्ला यांना नमुद केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in