चाचणी केली तरच कऱ्हाड पालिकेत प्रवेश : मुख्याधिकाऱ्यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश   - Admission to Karad Palika only after passing the test: Chief Minister's officer, orders to employees | Politics Marathi News - Sarkarnama

चाचणी केली तरच कऱ्हाड पालिकेत प्रवेश : मुख्याधिकाऱ्यांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

कराड शहरतील 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सूरू केले आहेत. पालिकेच्या इमारतीसह नागरी आरोग्य केंद्राशिवाय त्रिशंकू भाग, कार्वे नाका, बैल बाजार रोड भाग, कोल्हापूर नाका, भेदा चौक परिसरात लसीकरण केंद्र होणार आहे.

कऱ्हाड : कराड पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नगरसेनकांना कोरोनाची चाचणी सक्तीची असून जे कर्मचारी तपासणी करणार नाहीत. त्यांना पालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज दिले.

उद्या (मंगळवारी) पालिकेतील अधिकारी व नगरसेवकांसह नागरीकांना कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी दोन ठिकाणी स्वॅब टेस्टची तर चार ठिकाणी लसीकरणाची सुविधाही पालिकेने केली आहे. कराड शहरातील ४५ वयोवर्षावरील सगळ्यांचेच लसीकरण होणार आहे.

त्यासाठी त्वरीत शहरात कालपासून तीन लसीकरण केंद्रे उभारली होती. त्यात आणखी एक केंद्र वाढवले आहे. तर स्वॅब टेस्टसाठी दोन ठिकाणी सोय केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली. कराड शहरात 76 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. कोरोनावर नियंत्रण याने, यासाठी लसीकरणासह कोरोनाची तपासणी मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. 

त्यासाठी कराड शहरतील 45 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सूरू केले आहेत. पालिकेच्या इमारतीसह नागरी आरोग्य केंद्राशिवाय त्रिशंकू भाग, कार्वे नाका, बैल बाजार रोड भाग, कोल्हापूर नाका, भेदा चौक परिसरात लसीकरण केंद्र होणार आहे.

शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पालिका व नागरी आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून पालिका अधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. चाचणी न करणाऱ्यांना पालिकेत प्रवेश दिला जाणार नाही. 

- रमाकांत डाके (मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख