मोक्कातील संशयिताचा अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकांसमोरच आत्महत्येचा प्रयत्न  - Accused attempted suicide in front of Upper Superintendent of Police | Politics Marathi News - Sarkarnama

मोक्कातील संशयिताचा अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकांसमोरच आत्महत्येचा प्रयत्न 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 मार्च 2021

आरळे येथील निखील वाघमळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. यामुळे त्याला तसेच त्याच्या साथीदारांवर सातारा पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. वाघमळे हा मोका कोठडीत असून त्याला काल चौकशीसाठी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात आणण्यात आले होते.

सातारा : मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या संशयिताने चौकशी सुरू करताना काल रात्री अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. आरळे (ता. सातारा) येथील निखील प्रकाश वाघमळे (वय २९) असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी  वाघमळे विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
आरळे येथील निखील वाघमळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. यामुळे त्याला तसेच त्याच्या साथीदारांवर सातारा पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. वाघमळे हा मोका कोठडीत असून त्याला काल चौकशीसाठी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात आणण्यात आले होते.

ही चौकशी स्वत: धीरज पाटील हे करीत होते. चौकशी सुरु असतानाच वाघमळेने मला आता जगायचे नाही, माझे जगणेच मुश्किल झाले आहे. मी आता जीवच देतो, असे म्हणण्यास सुरुवात केली. हे म्हणत असतानाच
वाघमळेने हातात असणारी बेडी स्वत:च्या कपाळावर मारुन घेतली. यामुळे वाघमळेच्या कपाळावर दुखापत झाली.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी दिगंबर वाघेरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. यानुसार वाघमळेवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास हवालदार दगडे हे करीत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख