कऱ्हाडच्या कोरोना बैठकीकडे उदयनराजे, पृथ्वीराज चव्हाणांची पाठ

आजच्या या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण उपस्थित नव्हते. श्री. चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तर साताऱ्यात असूनही खासदार उदयनराजे भोसले हे कऱ्हाडातील या महत्वाच्या बैठकीला का उपस्थित राहिले नाहीत, याची मात्र, सर्वांनाच उत्सुकता होती.
Prithviraj Chavan and Udyanraje Bhosale
Prithviraj Chavan and Udyanraje Bhosale

सातारा : कोल्हापर व सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कऱ्हाडात दाखल झाले. यावेळी आयोजित केलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्यसभेचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित नव्हते. या दोन नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा मात्र, चांगलीच रंगली होती. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दाखल झाले. या बैठकीला कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील उपस्थित आहेत. 

आजच्या या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण उपस्थित नव्हते. श्री. चव्हाण हे मुंबईला असल्यामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे श्री. चव्हाण या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, अशी चर्चा कऱ्हाडात रंगली होती. तर साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ही या बैठकीला उपस्थित नव्हते. राष्ट्रवादी सोडल्यानंतर उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले. तेव्हापासून उदयनराजे भोसले हे श्री. पवारांपासून थोडे अंतर ठेऊनच राहात असल्याचे दिसते. 

भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र, या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गोतावळ्यात तेही जाऊन बसले होते. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री. पवारांची भेट घेतली होती. तर साताऱ्यात असूनही खासदार उदयनराजे भोसले हे कऱ्हाडातील या महत्वाच्या बैठकीला का उपस्थित राहिले नाहीत, याची मात्र, सर्वांनाच उत्सुकता होती. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com