अभिजित बिचुकले म्हणतात.. मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री करा...

ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री पदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो. महाराष्ट्रातील जनतेला सामान्यपणे जगण्यासाठी जीवन सुलभ करून दाखवितो.
Abhijit Bichukale says .. just make me CM one day ...
Abhijit Bichukale says .. just make me CM one day ...

सातारा : अभिनेता अनिल कपूर यांच्यानंतर आता साताऱ्यात चित्रपटातील नव्हे तर खराखुरा नायक निर्माण होत आहे. उद्धवराव तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुम्ही सर्व मंत्री निष्क्रीय आहात. मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री करा. मंत्री, संत्री आणि प्रशासनातील सगळ्यांना सुता सारख सरळ करतो, असे आवाहन बिग बॉस फेम अभिजित
आवाडे-बिचुकले यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. 

नायक चित्रपटात अभिनेता अनिल कपूर एक दिवसांकरिता मुख्यमंत्री होतो आणि समाजातील भ्रष्टाचार, अन्याय यांच्यावर आसुड ओडत सामान्यांच्या गळ्यातील ताईत होतो. या कथानकामुळे नायक हा चित्रपट चांगला चालला होता. बिग बॉस कार्यक्रम वेगवेगळ्या अर्थाने गाजविणारे साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे आता नायक होऊ पहात आहेत.

श्री. बिचुकले या युवकांने खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात निवडणूका लढविलेल्या आहेत. अर्थातच त्यांचे तसेच त्यांच्या पत्नीचे सातत्याने डिपॉझिट जप्त झालेले आहे. मात्र, निवडणूक म्हटली की बिचुकले हे रिंगणात असतातच. अशा या अभिजित बिचुकलेंना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यांनी नुकतेच एक प्रसिध्दी पत्रक काढून ते मुख्यमंत्र्यांना पाठविले आहेत. 

या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले की, लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुटुंबप्रमुख आहात आणि गेल्या वर्षभर आपणच आपल्या बंगल्यातून बाहेर येत नाही. मुख्यमंत्री या नात्याने प्रशासनावर तसेच सहकारी मंत्र्यांवर अंकुश इेऊ शकलेला नाहीत. कोरोना महामारीत आपण व आपले सहकार नियोजनात कमकुवत आहे, हे जनतेच्या निदर्शनास आलेले आहे.

गेल्या दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाचा प्रतिबंध केला असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकरांवर उपासमारीची वेळ आणली आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याची मला अस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, कलाकार व हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला सांगू इच्छितो आहे. आपण व आपले मंत्री निष्क्रिय आहात तसेच प्रशासनावर सरकारची पकड नाही, हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे.

अशा परिस्थितीत ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्री पदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रीमंडळ व प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो. महाराष्ट्रातील जनतेला सामान्यपणे जगण्यासाठी जीवन सुलभ करून दाखवितो. त्यामुळे संपूर्ण जग माझ्या नियोजनाला सलाम करेल. मला एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देऊन आपण भारताच्या राजकारणात महाइतिहास घडवावा, हीच अपेक्षा आहे, असे श्री. बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com