राज्यात ८.३२ लाख लसी उपलब्ध; तरीही लसीकरण बंद करून जनतेच्या जीवाशी खेळ....  - 8.32 lakh vaccines available in the state; Still playing with the lives of the masses by stopping vaccinations says MLA Suresh Bhole | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

राज्यात ८.३२ लाख लसी उपलब्ध; तरीही लसीकरण बंद करून जनतेच्या जीवाशी खेळ.... 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 मे 2021

लस उपलब्ध असतानाही महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे? राज्यातील आघाडी सरकार वर आरोप करताना आमदार सुरेश भोळे यांनी भाजप सह इतर राज्यातील लस उपलब्ध असल्याची  आकडेवारी नकाशाच्या मध्यांमातून दाखवली आहे.

जळगाव : राज्यात ८.३२ लाख लसी उपलब्ध आहेत, तरीही लसीकरण (Corona vaccination) बंद करून आघाडी सरकार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप भाजपचे आमदार व जळगावचे भाजप (Bhartiya Janata Party) जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी केला आहे. (8.32 lakh vaccines available in the state; Still playing with the lives of the masses by stopping vaccinations says MLA Suresh Bhole)

आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. ते म्हणतात, महाराष्ट्रात अद्यापही ८.३२ लाख लसी उपलब्ध आहेत. तरीही राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर उन्हात थांबून लस मिळेल. या आशेवर वाट पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून नाही, अस सांगितलं जातं आहे.

हेही वाचा : बारामतीत आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन 

लस उपलब्ध असतानाही महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या जीवाशी का खेळत आहे? राज्यातील आघाडी सरकार वर आरोप करताना आमदार सुरेश भोळे यांनी भाजप सह इतर राज्यातील लस उपलब्ध असल्याची  आकडेवारी नकाशाच्या मध्यांमातून दाखवली आहे.

आवश्य वाचा : राज्यात आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच लस मिळणार...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख