बावधन बगाडप्रकरणी ८३ जणांना अटक; बगाड्या, मानकरी अद्याप मोकाट

बावधन गावाला आजही पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.बगाड यात्रेनंतर पुढील कोणतेही धार्मिक विधी करू नयेत म्हणून प्रशासनाने बावधन येथे रात्री ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जाणवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांना सूचना केल्या.
83 arrested in Bawadhan Bagad case; Bagadya, Mankari is still absconding
83 arrested in Bawadhan Bagad case; Bagadya, Mankari is still absconding

वाई : वाई तालुक्यातील बावधन येथे प्रशासनाचा बंदी आदेश झुगारत बगाड यात्रा केल्याप्रकरणी या प्रकरणी 110 जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ८३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अद्यापही बगाडावरील मानकरी व बगाड्या पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी आज वाई पोलिस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बगाडाची मिरवणूक काढून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बावधन (ता. वाई) येथील अडीच ते तीन हजार लोकांवर वाई पोलिस ठाण्यात तहसिलदार रणजित भोसले यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 110 लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील 83 लोकांना पोलिसांनी शुक्रवारी (ता.2) अटक केली. त्यांना रात्रीउशीरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला. 

या गुन्ह्यात आज पुन्हा तेरा लोकांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान बावधन गावाला आजही पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बगाड यात्रेनंतर पुढील कोणतेही धार्मिक विधी करू नयेत म्हणून प्रशासनाने बावधन येथे रात्री ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जाणवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे आदींच्या उपस्थितीत ग्रामस्थांना सूचना केल्या.

बगाडाच्या आदल्या दिवशी गुरुवारी (ता.1) रात्री छबिण्याच्या निमित्ताने ग्रामस्थांनी भैरवनाथ देवाची पालखी मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक काढल्याबद्दल आज दहा ग्रामस्थ व इतर अनोळखी 25 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाघजाईवाडी येथे पालखी मिरवणूक काढल्याबद्दल चार ग्रामस्थ व इतर अनोळखी 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही गावाला पोलिस छावणीचे स्वरूप होते. या घटनेनंतर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी शेखरसिंह व पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल ग्रामस्थांवर कारवाई करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहेत. अद्यापही बगाडावरील मानकरी व बगाड्या पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com