7.5 किलो सोनेचोरी : मुख्य संशयित निखिल जोशी कोरोनाबाधित

निखिल जोशीचे साताऱ्यात अनेकांशी संबंध असल्याचे केरळ पोलिसांनी शोधून काढले होते.त्यानुसार त्याच्याशी संपर्कात आलेले, त्याच्या फोनमधील असलेल्या क्रमांकावरुन त्याचा शोध सुरु होता.
7.5 किलो सोनेचोरी : मुख्य संशयित निखिल जोशी कोरोनाबाधित
7.5 kg gold theft: Chief suspect Nikhil Joshi coroned

सातारा : केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी'वरील दरोड्याप्रकरणी संशयित परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखिल अशोक जोशी याला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याची आणखी चौकशी सुरू असतानाच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या कसबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एन. एस. राजीव यांनी दिली. दरम्यान, कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर पोलिस आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. 7.5 kg gold theft: Chief suspect Nikhil Joshi coroned

आता तो कोरोनामुक्त झाल्यानंतरच पुढील चौकशी होणार असल्याचे केरळ पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. पलक्कड येथील 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी'वर २४ जुलैला दरोडा पडला होता. त्याचा उलगडा २६ जुलै रोजी झाल्यानंतर केरळ राज्यात खळबळ उडाली होती. या दरोड्यात साडेसात किलो सोने आणि अठरा हजारांची रोकड चोरीला गेली होती. या दरोड्याप्रकरणी संशयित म्हणून परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला ६ ऑगस्ट रोजी पुणे-बंगळूर महामार्गावरील साताऱ्यातील 'हॉटेल फर्न' येथून अटक केली होती. 

दरम्यान, चोरीला गेलेले सोने सातारा येथे विक्री झाल्याचे समोर आल्यानंतर केरळ पोलिस वीस दिवस सातारा येथेच तळ ठोकून होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सातारा सोडले असून आता ते केरळमध्ये निखिल जोशी याच्याकडे आणखी चौकशी करत आहेत. केरळ येथे गेल्यानंतर निखिल जोशीकडे आणखी चौकशी सुरु असतानाच त्याल कोरोना झाला असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्यावर आता उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन. एस. राजीव यांनी दिली.

निखिल जोशीचे साताऱ्यात अनेकांशी संबंध असल्याचे केरळ पोलिसांनी शोधून काढले होते. त्यानुसार त्याच्याशी संपर्कात आलेले, त्याच्या फोनमधील असलेल्या क्रमांकावरुन त्याचा शोध सुरु होता. दरम्यान, चोरीला गेलेले सोने साताऱ्यातील काही सराफांनी घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर साताऱ्यातील काही सराफ रडारवर आले होते. त्यांच्याकडून केरळ पोलिसांनी २.४0 किलो सोने हस्तगत केले होते. अजून ५.१0 किलो सोने कुठे आहे, ते कोणत्या सराफाने घेतले याचा तपास अजून सुरुच आहेत.

केरळ लुटीतील सोने सराफ राहूल घाडगे आणि प्रतिभा हॉस्पिटलचे व्यवस्थापन पाहणारा डॉ. निलेश साबळे यांनी सराफांना स्वस्तात मिळवून दिले असल्याची माहिती केरळ पोलिांकडून यापूर्वीच देण्यात आली आहे. राहूल आणि निलेश हे दोघेही केरळ पोलिसांना सापडलेले नसल्यामुळे त्यांनी आता या दोघांवर कारवाई करण्यासाठी सातारा पोलिसांचे सहकार्य मागितले असून सातारा पोलिसांकडून त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in