कर्जमाफी मिळत नसल्याने २२ शेतकऱ्यांनी घेतलाय सामुहिक आत्महत्येचा निर्णय.....

विकास सोसायटीच्या संचालक मंडळाच्या दहा डिसेंबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत या शेतकर्‍यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्याचा ठराव केला असून, तो जिल्हा बँकेस सादर केला आहे. त्यानुसार बँकेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
22 farmers have decided to commit mass suicide due to non-receipt of loan waiver ....
22 farmers have decided to commit mass suicide due to non-receipt of loan waiver ....

कोरेगाव : शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये समावेश होत नसल्याने बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटीच्या सुमारे 22 सभासद शेतकर्‍यांनी सामुहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात बोरजाईवाडी सोसायटीचे सभासद डॉ. दीपक बनसोडे यांच्यासह 22 सभासदांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन दिले आहे. 

निवेदनात या २२ शेतकऱ्यांनी म्हटले की बोरजाईवाडी गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडते. 2015-16 मध्ये राज्यात महायुतीच्या काळात दुष्काळ पडला आणि महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार बोरजाईवाडीचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश झाला. हे गाव पूर्वी किन्हई महसूल मंडलामध्ये होते. महसूल मंडलांच्या पुनर्रचनेनंतर या गावाचा समावेश कुमठे मंडलामध्ये झाला.

दरम्यान, मंडल पुनर्रचनेच्या प्रक्रियेत दुष्काळग्रस्त गावांच्या यादीची माहिती वर्ग झाली नाही आणि कुमठे मंडल हे बागायती क्षेत्र असल्यामुळे बोरजाईवाडीलाही तोच निकष लावण्यात आला. शेतकर्‍यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेली शेतीकर्जे माफ झाली आहेत. आम्हाला मात्र कर्ज थकबाकीचे बक्षीस मिळाल्यात जमा आहे. याप्रश्नी जिल्हा बँकेचे पदाधिकारी, संचालकांसह अधिकार्‍यांच्या अनेकदा भेटी घेतल्या.

मात्र प्रत्यक्षात कर्ज माफीविषयी ठोस आश्‍वासन मिळाले नाही. विकास सोसायटी आणि सहकार विभागाकडे चौकशी केली असता, शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांमध्ये किसान क्रेडीट कर्ज योजनेचा पात्र अथवा अपात्र या दोन्ही विभागांमध्ये समावेश होत नसल्याचे सांगण्यात आले. बँक आणि सोसायटीने त्या-त्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

दरम्यान, विकास सोसायटीच्या संचालक मंडळाच्या दहा डिसेंबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत या शेतकर्‍यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्याचा ठराव केला असून, तो जिल्हा बँकेस सादर केला आहे. त्यानुसार बँकेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही होत नसल्यामुळे आम्हास सामुहिक आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाने डॉ. दीपक बनसोडे यांना गेल्या 17 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवलेल्या पत्रात म्हटले की 'आपले निवेदन कार्यवाहीसाठी उपनिबंधक कार्यालयास पाठवले असून आपण योग्य त्या मार्गाचा अवलंब करून न्याय मागावा आणि सामुहिक आत्महत्येपासून आपण परावृत्त व्हावे.'

कर्जमाफी योजना शासनाची : सुनील माने

या संदर्भात सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "शेतकरी कर्ज माफी योजना राज्य शासनाची असल्याने बोरजाईवाडीतील शेतकर्‍यांचा विषय राज्य शासनाशी निगडीत आहे. हा विषय शासनस्तरापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही निश्चितपणे करु आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. आम्ही देखील शेतकरीच आहोत, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही समजू शकतो."


 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com