आनेवाडी टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंसह १७ जणांची निर्दोष मुक्तता - 17 people including Shivendrasinghraje acquitted in Anewadi Tolanaka agitation case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

आनेवाडी टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंसह १७ जणांची निर्दोष मुक्तता

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 11 जानेवारी 2021

टोलनाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून भुईंज पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. याची वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

वाई : आनेवाडी टोलनाक्यावर नियमबाह्य टोल वसुलीविरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता केली.

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्यक सेवा सुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत  असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी १८ डिसेंबर २०१९ ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.

यावेळी साताऱ्याकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते यांच्यासह ८० लोकांनी टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

टोलनाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून भुईंज पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. याची वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता केली आहे. शिवेंद्रसिंहराजेंसह  समर्थकांच्यावतीने ॲड.शिवराज धनवडे, ॲड. आर. डी. साळुंखे, ॲड. संग्राम मुंढेकर, ॲड. प्रसाद जोशी यांनी बाजू मांडली होती. तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड. मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख