शरद पवारांनी कधी कुस्ती खेळली? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहे ना!

लहानपणी ते नारळावरील कुस्त्या खेळले असतील. आम्ही सुध्दा खेळत होतो. मी सोडून बाकीच्यांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात दृढ होत असून दीर्घ काळाच्या अनुभवनातून सगळ काही मलाच मिळाले पाहिजे. ही मानसिकता या महाराष्ट्रात निर्माण होत आहे. ही नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असे ही सदाभाऊंनी स्पष्ट केले.
When did Sharad Pawar play wrestling? Still he is the president of the Wrestling Council!
When did Sharad Pawar play wrestling? Still he is the president of the Wrestling Council!

सातारा : पॉप गायिका रिहानाच्या व्टीटवरून सचिन तेंडूलकरवर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना सदाभाऊ खोत यांनी आज श्री. पवार यांच्यावर घाणाघाती टीका केली. ते म्हणाले, शरद पवार साहेब हे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी क्रिकेट खेळले, कधी बॉलिंग केली, बॅटिंग केली. तरी ते अध्यक्ष झाले. दुसऱ्या बाजूला ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी लंगुटा घालून कुस्त्या खेळल्या, किस्ताक घातले, मला तरी कधी दिसले नाही. मी जुन्या लोकांना विचारले पवार साहेब कधी हिंद केसरी झाले होते, त्यांनी नाही म्हणून सांगितले, अशी घाणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी श्री. पवार यांच्यावर केली.

दरम्यान,  मी सोडून बाकीच्यांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात दृढ होत असून दिर्घ काळाच्या अनुभवनातून सगळा काही मलाच मिळाले पाहिजे ही मानसिकता या महाराष्ट्रात  निर्माण होत आहे. ही नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सदाभाऊ खोत यांनी आज येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून शरद पवारांवर शरसंधान साधले. 

पॉप गायिका रिहानाने केलेल्या व्‍टीटवरून उठलेल्या व्टीट युध्दावर सडकून टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, रिहाना या पॉप गायिकेने काहीतरी व्टीट केले होते. हिंदूस्थानच्या शेतकऱ्यांचा तिला मोठा कळवळा आला होता. ती ज्या खंडात राहते, तेथे अनेक लोक राहतात, त्याविषयी तीने कधी व्टीट केले नाही. आमच्यातील काही लोकांनी तिच्या व्टीटवर आपले व्टीट करत पंतप्रधानांवर आरोप केले. मुळात आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सक्षम आहेत.

सचिन तेंडूलकरांनी केलेल्या व्‍टीटवर पवार साहेब म्हणाले होते, त्यांना ज्या क्षेत्रातील कळते त्याने त्याच विषयावर बोलावे. यावर मला थोडे हसू आले, असे सांगून सदाभाऊ म्हणाले, मी म्हटलं की सचिनला शेतीतलं काहीही कळत नाही. पण पवार साहेब क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी क्रिकेट खेळले, कधी बॉलिंग केली, बॅटींग केली. तरी ते अध्यक्ष झालेच ना. दुसऱ्या बाजूला ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी कवा लंगुटा घालून कुस्त्या खेळल्या होत्या. कवा किस्ताक घातले. मला तरी कधी दिसला नाही. मी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांनाही विचारले, पवार साहेब कधी हिंद केसरी झाले होते का, त्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितले. ठिक आहे, लहानपणी ते नारळावरील कुस्त्या खेळले असतील. आम्ही सुध्दा खेळत होतो. मी सोडून बाकीच्यांना काहीही कळत नाही, ही पध्दत महाराष्ट्रात दृढ होत असून दीर्घ काळाच्या अनुभवनातून सगळ काही मलाच मिळाले पाहिजे. ही मानसिकता या महाराष्ट्रात निर्माण होत आहे. ही नवनेतृत्वाला हानीकारक आहे, असे ही सदाभाऊंनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com