ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकार न्यायालयात : नाना पटोले - The OBC reservation issue has gone to the state government court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकार न्यायालयात : नाना पटोले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 जून 2021

केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही, त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे.

जळगाव : ओबीसी आरक्षण OBC Reservation प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचे नुकसान झाले आहे, भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. राज्य सरकार या बाबतीत न्यायालयात गेले आहे, अशी माहिती काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. The OBC reservation issue has gone to the state government court

याबाबत बोलताना श्री. पटोले म्हणाले की, ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. २०१७ मधे हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही.

हेही वाचा : इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च ; काश्मिर प्रश्नांवरुन पाकिस्तानवर हल्लाबोल

केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही, त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. 

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच 

विधानसभा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होणार आहे, येत्या अधिवेशनात ही निवड करण्यात येईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.  ते म्हणाले की, पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यावेळी अध्यक्ष निवड होईल. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सत्तेतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेऊ, अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा असेल, मात्र त्यावर सत्तेतील तिन्ही पक्षाची सहमती असेल. निवडीच्या दिवशीच अध्यक्ष पदाचे उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख