मुश्रीफ यांच्याशी पंगा घेणाऱ्या डीवायएसपी सुरज गुरव यांची तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली

कऱ्हाडमध्ये त्यावेळी स्थिती हातळण्याची कसोटी होती. भर चौकात गुंडाचा गोळ्या घालून खून झाला होता. त्याच्या तपासापासून गुंडगिरीवर पोलिसांचे नियंत्रण आणण्याची कार्यवाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे नावही झाले. त्या चांगल्या कामाचे गिफ्ट त्यांना मिळाले. येथे येऊन वर्षभराचा कालवधी पूर्ण होतोय त्याला चार दिवसही होत नाहीत, तोच त्यांची बदली नागपूरला सहायक पोलिस आयुक्तपदी झाली आहे.
Dysp Suraj Gurav
Dysp Suraj Gurav

कऱ्हाड : गुंडांमध्ये वचक निर्माण करणाऱ्या सिंगम स्टाईल पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची वर्षातच तिसऱ्यांदा तडकाफडकी बदली झाली. त्याला राजकीय वादाची झालर असून दोन वर्षापूर्वी कोल्हापूर येथे महापौर निवडी वेळी ज्येष्ठ नेते व विद्यमान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेला वादाचे पडघम आत्ताच्या बदली मागे ही आहेत. मात्र, चांगल्या कामाचे सरकारने सुरज गुरव यांना गिफ्ट दिल्याची ही पोलिस वर्तूळात चर्चा आहे.

पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कऱ्हाडला वर्षापूर्वी 22 सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. हजर झालेल्या दिवशीच त्यांनी त्यांची भुमिका स्प्ष्ट केली. स्वागताला येणाऱ्यांचा बायोडाटा आधीच समोर ठेवत त्यांना नीट वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नवीन आहेत, बघू असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किमान डझनभर कुख्यात गुंडाना श्री. गुरव यांनी खाकी स्टाईलने सरळ केले.

रात्री अपरात्री वाढदिवस साजरा व्हायचा, फटक्यांची आतषबाजीने साम्नाय घाबरायचे, तलावरीने केक कापला जायचा, या शहरासह तालुक्यात या प्रथा होत्या. त्यावरही हातोडा चालवून श्री. गुरव यांनी थेट गुन्हे दाखल केले. वाढदिवस सिलेब्रेशन करणाऱ्यांच्या समाचार घेतला. तब्बल वीसपेक्षा जास्त गुन्हा त्याबाबत तालुक्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

मोबाईलचे स्टेटस जर गुंडगिरीचे असेल तर त्यालाही चोप देण्यासाोबतच वर्षभरात गुरव यांनी दोन मोक्काच्या कारवाया केल्या. त्याशिवाय एक स्थानबद्धतेची कारवाई झाली. ती तब्बल 14 वर्षाने झाली. ही कारवाई करतानाच श्री. गुरव यांना समाजातही स्वतंत्र ओळख निर्माण केली. कऱ्हाडची माणुसकी नावाचा ग्रुप तयार करून त्यांनी सामाजिक कार्य केले.

पोलिस खात्यात हटके काम केल्याने श्री. गुरव यांचा चांगलाच गवगवा झाला. पोलिस उपअधीक्षक गुरव यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी त्यांचा कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. हमरीतुमरीपर्यंत गेलेल्या वादाची त्यावेळी राज्यभर चर्चा झाली होती. त्यावेळी तेथून श्री. गुरव यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर काम करतात तोच तेथूनही त्यांची थेट कऱ्हाडला बदली झाली.

कऱ्हाडमध्ये त्यावेळी स्थिती हातळण्याची कसोटी होती. भर चौकात गुंडाचा गोळ्या घालून खून झाला होता. त्याच्या तपासापासून गुंडगिरीवर पोलिसांचे
नियंत्रण आणण्याची कार्यवाही त्यांनी केली. त्यामुळे त्यांचे नावही झाले. त्या चांगल्या कामाचे गिफ्ट त्यांना मिळाले. येथे येऊन वर्षभराचा कालवधी पूर्ण होतोय त्याला चार दिवसही होत नाहीत, तोच त्यांची बदली नागपूरला सहायक पोलिस आयुक्तपदी झाली आहे. त्यामागे दोन वर्षापूर्वी झालेल्या वादाची झालर असल्याची चर्चा आहे. 

कोविड योद्धाही....

पोलिस उपअधीक्षक गुरव यांना कोरोनाच्या काळात येथे चांगले काम केले. गरजूंच्या मदतीपासून ते पोलिसांच्या सुरेक्षालाही त्यांनी प्राधान्या दिले. सगळ्यात पुढे होवून काम करणाऱ्या गुरव यांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यासह घरतील सर्वानाच  कोरोनाने ग्रासले. त्रास कमी आहे. दवाखान्यात गेलो तर बेड आडेल, ही भुमिका घेत त्यांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला. आत्ता ते बरे झाले आहेत. मात्र  त्यानंतर तब्बल 70 हून अधिक शासकीय कोरोना योद्धांनी त्याचे अनुकरण करत गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com