वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतंय; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल - Who exactly runs the Ministry of Finance; Prithviraj Chavan's attack | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतंय; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतंय आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता, तेही जाहीर करावे. नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज असा कोणताच निर्णय दिसत नाही. 

कऱ्हाड : केंद्रीय वित्त मंत्रालायाने कोणता शेवटचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता, ते जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरव्दारे दिले आहे. वित्त मंत्रालयाने काल रात्री एक परिपत्रक काढले होते. त्यात भविष्य निर्वाह निधीचे व्याजाचे दर कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर कमी करणार असल्याचे परिपत्रकात नजरचुकीने पडले आहे, असे व्टीट करून जाहीर केले. त्या ट्विटरवर माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी  निशाना करून अर्थ मंत्री निर्मला सीतारामनसह वित्त मंत्रालयावर हल्लाबोल केला. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतंय आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता, तेही जाहीर करावे. नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज असा कोणताच निर्णय दिसत नाही. 

त्यात भर म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या व्याजाचा घोळ समोर येतो असून तो चुकीचा आहे. युपीएचे सरकार होते त्यावेळी 2013 मध्ये भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर 8.8 टक्के इतका होता. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर तो व्याज दर घसरत आहे. तो आज 7.1 टक्क्यापर्यंत घसरला होता. तो काल 6.4 टक्के इतका खाली आता होता. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. पाच राज्यात निवडणूका सुरू आहेत. म्हणून अचानक वित्त मंत्रालयाने आपाल निर्णय बदलला आहे का, तेही जाहीर करावे, असेही आव्हान श्री. चव्हाण यांनी दिले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख