आम्ही राष्ट्रीय भूमिका मांडली; सुनील केदारचा त्याच्याशी संबंध नाही : पृथ्वीराज चव्हाण

मुळात सोनिया गांधींनी पुढे येऊ अध्यक्षस्थान स्विकारावे किंवा राहुल गांधींनी राजीनामा देऊन पुन्हा पूर्ण वेळ अध्यक्ष व्हावे, असे आम्ही म्हटले होते. या दोघांची तयारी नसेल तर तिसरा व्यक्ती शोधावा लागले.
Congress Leader Prithviraj Chavan
Congress Leader Prithviraj Chavan

सातारा : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आमची पहिली पसंती सोनिया गांधी यांना होती. त्यांनी नकार दिला तर राहुल गांधींनी जबाबदारी घ्यावी, असे आमचे मत होते. मात्र, या दोघांनी नकार दिल्यानंतर तिसऱ्या व्यक्तीचा विचार करावा, अशी आमची भूमिका होती, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ''सरकारनामा'' शी बोलताना दिले. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २३ जणांनी एक पत्र पाठविले होते. या पत्रावरून मोठा गदारोळ झाला. काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सरकारनामाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. 

हे पत्र पाठविल्यामुळे दुग्धविकास मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांनी सोनिया गांधींची माफी मागावी, अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एकाने कुणीतरी सांगितले म्हणून सुनील केदार बोलत आहेत. मुळात आम्ही राष्ट्रीय प्रश्न उचलला आहे. याच्याशी सुनील
केदारचा काहीही संबंध नाही. आमची भुमिका आम्ही पत्रातून कळविली आहे. या पत्राबाहरे आमचे काहीही म्हणणे नाही.
 
गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष व्हावा, असे तुम्ही पत्रातून सांगितल्याचा आरोप होत आहे, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, ते सर्व चुकीचे आहे. मुळात सोनिया गांधींनी पुढे येऊ अध्यक्षस्थान स्विकारावे किंवा राहुल गांधींनी राजीनामा देऊन पुन्हा पूर्ण वेळ अध्यक्ष व्हावे, असे आम्ही म्हटले होते. या दोघांची तयारी नसेल तर तिसरा व्यक्ती शोधावा लागले.

गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करावा असे म्हटलेले नाही, हे चुकीचे असून मिडियातून केवळ अफवा पसरविली आहे. एकुणच अध्यक्ष निवडीबाबत तुमची भूमिका काय होती, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, आमची पहिली पसंती सोनिया गांधी यांना होती.
तर दुसरी पसंती राहुल गांधींना होती. ते दोघोही तयार नसतील तर त्यांना घोड्यावर कसे बसवायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com