गंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्याने गंगामातेला रडवले : राहुल गांधींचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

गंगा नदीच्या ११४० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात दोन हजारहून अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले.
Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi
Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi

नवीदिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) गंगेच्या पात्रात (Ganga River) मोठ्या संख्येने मृतदेह आढळल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) "गंगेने बोलावल्याचा दावा करणाऱ्यानेच गंगामातेला रडवले'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना  (Narendra Modi) टोला लगावला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने (Congress) कोरोनामुळे गुजरातमधील (Gujrat) मृतांच्या संख्येवरूनही सरकारला लक्ष्य केले आहे. (Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi)

गंगा नदीच्या ११४० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात दोन हजारहून अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले. "गंगेने बोलावले असे जो म्हणत होता त्यानेच गंगामातेला रडवले आहे", असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले. गंगेच्या काठावरील गावांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्यामुळे मृतदेहांचे दफन केले जात असल्याचे तसेच काहींनी तसेच मृतदेह नदीपात्रात सोडून दिल्याचेही आढळून आले आहे. 

दुसरीकडे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील मृतांच्या संख्येवरून सत्ताधारी भाजपवर आकडे दडविल्याचा आरोप केला. गुजरातमध्ये एक मार्च ते १० मे दरम्यान १.२३ लाख मृत्यू दाखले वाटप झाले असताना राज्य सरकारने केवळ ४२१८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

 गुजरातमध्ये मागील वर्षी (२०२०) मध्ये याच कालावधीत ५८ हजार मृत्यू दाखले देण्यात आले होते. ही ६५ हजारांची दुपटीहून अधिक वाढ संकट किंवा नैसर्गिक आपत्तीशिवाय शक्य नाही. गुजरात सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडे लपवीत असल्याचा संशय आहे. या संशयाला गंगा नदीमध्ये वाहणाऱ्या मृतदेहांच्या संख्येमुळे बळ मिळत असल्याचा दावा, चिदंबरम यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com