MP Udayanraje congratulated Yogi Adityanath for these reasons | Sarkarnama

या कारणांसाठी उदयनराजेंनी केले योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला. तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेऊन अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्र नगरीत ''छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय'' स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन करतो.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात झालेल्या अपमानाचा बदला घेऊन अखंड हिंदूस्तानावर राज्य केले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रानगरीत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय स्थापन्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. त्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो, अशी भावना साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

आग्रा येथे उभारण्यात आलेल्या मुघल म्युजियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा करताना श्री. योगी यांनी उत्तर प्रदेश सरकार राष्ट्रवादी विचारांवर चालणारे आहे.

गुलामी मानसिकतेच्या प्रतिकात्मक चिन्हांना दूर करीत राष्ट्राप्रती गौरव करणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 'आमचे नायक मुघल होऊ शकत नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजचं आमचे नायक आहेत. '
असे स्पष्‍ट केले. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वागत करून अभिनंदन केले.

उदयनराजेंनी यासंदर्भात व्टिटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उदयनराजे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला. तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेऊन अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्र नगरीत ''छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय'' स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन करतो.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख