Minister of State for Home Affairs celebrates the birthday of a police officer in the convoy | Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांनी केला ताफ्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस      

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 27 जुलै 2020

पोलिस हवालदार जयवंत भाऊसाहेब कराळे यांचा वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी या पोलिस कर्मचाऱ्यास बोलावून त्याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. तसेच पाटणच्या विश्रामगृहात त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. 

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पाटण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या पायलटच्या ताफ्यात असणाऱ्या पोलिस हवालदार जयवंत कराळे यांचा  वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी या पोलिस कर्मचाऱ्यास बोलावून त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच पाटणच्या विश्रामगृहात त्यास शुभेच्छा देऊ केक कापून वाढदिवस साजरा केला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई एक नेता म्हणून मतदारसंघातील जनतेची काळजी घेतात. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होतात तशाच प्रकारे ते त्यांच्यासोबत सेवेत असणाऱ्या शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचीही काळजी घेतात त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतात. याचा प्रत्यय या घटनेमुळे आला.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पाटण दौऱ्यावर होते त्यांच्या दौऱ्यात पोलिस पायलटच्या ताफ्यात असणारा पोलिस हवालदार जयवंत भाऊसाहेब कराळे यांचा वाढदिवस असल्याचे समजले. त्यांनी या पोलिस कर्मचाऱ्यास बोलावून त्याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. तसेच पाटणच्या विश्रामगृहात त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. 

यावेळी त्यांच्याबरोबर सेवेत असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार उपस्थित होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सद्‌हृयी गृहराज्यमंत्री अशी प्रतिमा गृहविभागात निर्माण झालेली आहे. गृहराज्यमंत्री म्हणून प्रसंगी कठोरपणा व कनवाळूपणा या दोन्हीचे दर्शन यानिमित्ताने दिसून आले.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख